आयसीसी बोर्डाने ग्रेग बार्कले यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी दुसऱ्यांदा दोन वर्षांसाठी एकमताने पुन्हा निवड केली आहे. आयसीसीने शनिवारी ही घोषणा केली. ग्रेग बार्कले यांची बिनविरोध निवड झाली आणि मंडळाने ग्रेग बार्कले यांच्या पुढील दोन वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून कामाला पूर्ण पाठिंबा दिला. तवेंगवा मुकुहलानी यांनी माघार घेतल्याने बार्कले यांची बिनविरोध निवड झाली. ग्रेग बार्कले ऑकलंडमधील व्यावसायिक वकील आहेत. बार्कले यांची नोव्हेंबर २०२० मध्ये आयसीसी चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी दुसऱ्यांदा त्यांच्या पुनर्नियुक्तीबद्दल ग्रेग बार्कले म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड होणे हा एक सन्मान आहे आणि त्यांच्या समर्थनासाठी मी माझ्या सहकारी आयसीसी संचालकांचे आभार मानू इच्छितो.” ते पुढे म्हणाले की, “आयसीसीने क्रिकेटच्या खेळाला प्रोत्साहन दिले आहे. लहान संघांपासून ते मोठ्या संघांपर्यंत सर्वांना आयसीसीने मदत केली आहे. क्रिकेटच्या भविष्यासाठी एक रोडमॅप तयार करण्यात येणार असून त्यावाबत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.” आयसीसी मध्येच खेळणाऱ्या संघांसाठी मोठी पावले उचलली जातील असेही ते म्हणाले.

हेही वाचा :  T20 WC 2022: ‘सूर्यकुमार यादवकडे दुर्लक्ष केल्याने…’; हार्दिक पांड्याची शास्त्री, कोहलीच्या धोरणांवर टीका 

ग्रेग बार्कले आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांत आम्ही आमच्या जागतिक विकास धोरणाच्या शुभारंभासह लक्षणीय प्रगती केली आहे, जी आमच्या खेळासाठी यशस्वी आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी स्पष्ट दिशा प्रदान करते.” क्रिकेट खेळासाठी आयसीसी सदस्यांसोबत काम करत राहण्यास बार्कलेंना आनंद झाला. त्याच्या संभाषणात, बार्कले म्हणाले, “क्रिकेटमध्ये सामील होण्याचा हा एक रोमांचक काळ आहे आणि मी खेळाला आणखी मजबूत करण्यासाठी, तसेच पुढे नेण्यासाठी आमच्या सदस्यांसोबत जवळून काम करत आहे. त्यांना माझ्याकडून जे काही सहकार्य हवे असेल ते मी देण्यास तयार आहे.”

हेही वाचा : प्रो.कब्बडी लीग: महाराष्ट्र डर्बी दुसऱ्या लढतीत यु मुंबाने काढला पराभवाचा वचपा, पुणेरी पलटणची हाराकिरी

ऑकलंडचे राहणारे वकील ग्रेग बार्कले यांची नोव्हेंबर २०२० मध्ये आयसीसी चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे (NZC) अध्यक्ष आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०१५ चे संचालक होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Greg barclay with greg barclay as icc chairman for another two years he will be tasked with taking cricket forward avw
Show comments