बलाढय़ मुंबई संघाला विजय हजारे करंडक पश्चिम विभागीय क्रिकेट स्पध्रेच्या दुसऱ्या सामन्यातही आपले खाते उघडण्यात अपयश आले. रोमहर्षक लढतीत गुजरातने मुंबईचा एक चेंडू आणि चार विकेट राखून पराभव केला.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मग शोएब खान, सूर्यकुमार यादव आणि भाविश शेट्टी यांच्या फलंदाजीच्या बळावर मुंबईने मर्यादित षटकांमध्ये २३२ धावा केल्या. त्यानंतर गुजरातच्या पार्थिव पटेल आणि ध्रुव रावल यांनी ६७ धावांची सलामी दिली. पटेल ४९ धावांवर बाद झाला, तर रावलने ८९ चेंडूंत ३ चौकारांसह ६१ धावा केल्या. त्यानंतर वाय. वेणुगोपाल रावने ६१ चेंडूंत ७ चौकारांनिशी नाबाद ५८ धावा केल्या. त्यामुळे गुजरातचा विजयाचा मार्ग सुकर ठरला. राव आणि जेसल कारिया (नाबाद २१) यांनी ४२ धावांची अभेद्य भागीदारी करून गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ५० षटकांत सर्व बाद २३२ (शोएब शेख ४४, सूर्यकुमार यादव ५७, भाविश शेट्टी ३८; जसप्रित बुमराह २/३५, रोहित दहिया २/३८) पराभूत वि. गुजरात : ४९.५ षटकांत ६ बाद २३६ (पार्थिव पटेल ४९, ध्रुव रावल ६१, वाय. वेणुगोपाल राव नाबाद ५८; धवल कुलकर्णी २/४९, अभिषेक नायर २/४६)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा