नवी दिल्ली : गतविजेता गुजरात जायंट्स आणि चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये आगामी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सलामीची लढत रंगणार आहे. हा सामना ३१ मार्चला अहमदाबाद येथे खेळवला जाईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी जाहीर केले.
हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने गतवर्षी पदापर्णाच्या हंगामातच ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवण्याची किमया साधली होती. यंदा गुजरातचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाविरुद्ध करणार आहे. ‘बीसीसीआय’ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, यंदाच्या स्पर्धेत ५२ दिवसांत ७० साखळी सामने होतील. गतहंगामाप्रमाणे यंदाही दहा संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
१ एप्रिलला हंगामात प्रथम दोन सामने होणार आहेत. दुपारच्या सामन्यात (३.३० वाजता सुरुवात) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ समोरासमोर येतील. त्यानंतर सायंकाळी (७.३० वाजता सुरुवात) लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होईल. मुंबई इंडियन्सची सलामीची लढत २ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध होणार आहे.
सोमवार ते शुक्रवार एकेक सामना होणार असून शनिवार आणि रविवारी प्रत्येकी दोन सामने होतील. साखळी फेरीतील अखेरचा सामना २१ मे रोजी बंगळूरु आणि गुजरात यांच्यात होईल.
अंतिम सामना २८ मे रोजी
गेल्या हंगामातील सर्व साखळी सामने मुंबईमध्ये झाले होते. यंदा मात्र जुन्या पद्धतीनुसार सामने होणार असून सर्व संघ सात सामने घरच्या मैदानावर आणि सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळतील. या स्पर्धेचा अंतिम सामना २८ मे रोजी खेळवण्यात येईल. बाद फेरीच्या सामन्यांची ठिकाणे आणि वेळापत्रक काही दिवसांनंतर जाहीर केले जाईल, असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले.