WPL 2023 1st Match MIW vs GGW: गुजरात जायंट्सला महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला. डीवाय पाटील स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीला दुखापत झाली. तिला तातडीने बाहेर नेण्यात आले. ही घटना पहिल्याच षटकातच पाहायला मिळाली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स पहिल्या सामन्यात १४३ धावांनी आपला पहिला विजय नोंदवला

पहिल्याच षटकात दुखापत झाली –

Pratika Rawal World Record She Scored 444 Runs in Just 6 Matches After International Debut in Womens ODI
INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
India Beat Ireland by 305 Runs and Registers Biggest Margin Victory in Womens ODI Cricket INDW vs IREW
INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक

नॅट ब्रंटने षटकातील चौथा चेंडू बेथ मुनीला टाकला आणि मुनीने तो कव्हर पॉईंटकडे खेळला. त्यानंतर ती एक धाव शोधत होती, पण धाव पूर्ण होणार नाही हे लक्षात आले. अशा परिस्थितीत तिने हरलीन देओलला दुसऱ्या टोकाला परत पाठवले. यादरम्यान, जेव्हा मूनी मागे वळली तेव्हा तिच्या घोटा मुरगळला. तिला तीव्र वेदना होत होत्या, त्यानंतर लगेच फिजिओला बोलावण्यात आले. पण गुजरात जायंट्सची कर्णधार अस्वस्थ दिसत होती. अखेर तिला इतराच्या साहाय्याने बाहेर घेऊन जाण्यात आले. त्यानंतर ती परत फलंदाजीला येणार नसल्याचे सांगण्यात आले.

कर्णधार रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडल्यानंतर गुजरात जायंट्सला आणखी एक धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर हरलीन देओल शून्यावर बाद झाली. तिला नॅट ब्रंटने झेलबाद केले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर अॅशले गार्डनरही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर एकामागून एक विकेट पडत राहिल्या. त्यानंतर गुजरात जायंट्सने १५.१ षटकानंतर ९ बाद ६४ धावा केल्या. त्यामुळे त्यांना पहिल्याच सामन्यात मोठा पराभव पत्कारावा लागला. त्याचबरोबर मुंबईकडून सायका इशाक सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तिने ३९ चेंडूंच्या खेळीत १४ चौकार मारले. त्याचबरोबर तिने इतिहास रचला आहे. ती या स्पर्धेतील अर्धशतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने पहिल्याच डावात २०० धावांचा टप्पा पार करत इतिहास रचला. त्याचबरोबर मुंबईकडून सायका इशाक सर्वाधिक ४ विकेट

हेही वाचा – WPL 2023 MI vs GG: हरमनप्रीत कौर आणि मुंबई इंडियन्सने रचला इतिहास; पहिल्याच सामन्यात केला ‘हा’ शानदार कारनामा

त्याचबरोबर सलामीवीर हिली मॅथ्यूजने ३१ चेंडूत ४७ धावा केल्या. तसेच अमेलिया केरने २४ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या. नताली सीव्हरने २३ आणि पूजा वस्त्राकरने १४ धावांचे योगदान दिले. यास्तिका भाटिया एक धाव काढून बाद झाली. इसी वँगने एका चेंडूत सहा धावा केल्यानंतर नाबाद राहिली. गुजरात जायंट्सकडून स्नेह राणाने सर्वाधिक दोन बळी घेतले. ऍशले गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेरेहम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader