WPL 2023 1st Match MIW vs GGW: महिला क्रिकेटसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. महिला प्रीमियर लीग २०२३ (WPL 2023) ४ मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात रात्री आठ वाजता सुरु होणार आहे. विशेष म्हणजे या मॅचमध्ये दहावीत शिकणारी एक मुलगी मैदान गाजवताना दिसणार आहे. गुजरात जायंट्सची खेळाडू शबनम शकील केवळ १५ वर्षांची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनम यादवसोबत ती सर्वात तरुण क्रिकेटर आहे. शबनमचा जन्म १७ जून २००७ रोजी झाला. आंध्र प्रदेशातील मूळ क्रिकेटपटू विशाखापट्टणम येथील शिव सिवनी स्कूल, मेरीपलेम येथील दहावीची विद्यार्थीनी आहे. ती उजव्या हाताची फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज आहे. तिला गुजरात जायंट्सने १० लाख रुपयांना विकत घेतले आहे.

अशा प्रकारे क्रिकेटची आवड निर्माण झाली –

शबनम शकीलच्या क्रिकेट प्रेमाची कहाणीही रंजक आहे. तिच्या वडिलांना वेगवान गोलंदाज म्हणून क्लब क्रिकेट खेळताना पाहिल्यावर तिला प्रथम क्रिकेटची आवड निर्माण झाली. त्यावेळी ती फक्त आठ वर्षांची होती. तिची क्रिकेटची आवड पाहून वडिलांनी तिला विशाखापट्टणम येथील एनएडी अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला.

तिथे प्रशिक्षक नागराजू यांनी तिला अकादमीमध्ये प्रशिक्षण दिले. संध्याकाळी ती विशाखापट्टणम जिल्हा क्रिकेट असोसिएशन (VDCA) मैदानावर सतीश रेड्डी आणि कृष्णा राव यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करायची.

११० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता –

शबनम शकीलमध्ये ताशी ११० किमी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. ती तिच्या किफायतशीर गोलंदाजीसाठी ओळखली जातो. या प्रतिभेमुळे तिला प्रादेशिक स्तरावर क्रिकेट खेळताना पाहून भारतीय निवड समितीचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर ती इतर २५ मुलींसह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या शिबिरात सामील झाली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार गोलंदाजी –

शबनम भारताच्या अंडर-19 महिला संघाची सदस्य आहे. तिने २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. ही मालिका २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत मुंबईतील एमसीए वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यासह, गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तिन शानदार गोलंदाजी करताना ७ विकेट्स घेतल्या होत्या.

अंडर-१९ टी-२० विश्वचषक संघातील खेळाडू –

ती २०२३ मध्ये भारतीय महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषक संघातील खेळाडू आहे. मात्र, शबनमला स्पर्धेतील केवळ दोनच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. शबनमने आंध्र प्रदेश महिला, भारत अ महिला अंडर-19, इंडिया बी महिला अंडर-19 आणि भारत महिला अंडर-19 साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. झुलन गोस्वामी आणि जसप्रीत बुमराह हे तिचे आवडते खेळाडू आहेत. स्नेहा दीप्ती, विजाग, आर कल्पना आणि एस मेघना यांच्यानंतर कृष्णा जिल्ह्यातील, शबनम ही टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारी आंध्र प्रदेशातील चौथी महिला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat giants player shabnam shakeel a class 10 student will play in the wpl 2023 tournament vbm