Robin Minz out of IPL 2024 : आयपीएलच्या १७ व्या मोसमात, जिथे काही खेळाडू पदार्पणासाठी उत्सुक आहेत. तर काही खेळाडू हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी बाहेर पडले आहेत. स्पर्धेतून बाहेर पडणाऱ्यांच्या यादीत गुजरात टायटन्सच्या आणखी एका खेळाडूच्या नावाचा समावेश झाला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सला हंगाम सुरु होण्यापूर्वी तिसरा मोठा धक्क बसला आहे. कारण मोहम्मद शमी अगोदर टाचेवर शस्रक्रिया झाल्यामुळे बाहेर पडला होता. आता रॉबिन मिन्झ बाईक अपघातात दुखापत झाल्यामुळे संपूर्ण हंगमातून बाहेर झाला आहे. याबाबत कोच आशिष नेहराने माहिती दिली आहे.
त्यामुळए कर्णधार शुबमन गिलसाठी आणखी एक तणाव वाढवाणारी बातमी आहे. पहिल्यांदा मोहम्मद शमी संपूर्ण हंगामातून बाहेर झाला होता, त्यानंतर मॅथ्यू वेडनेही पहिल्या काही सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले होते. आता या यादीत रॉबिन मिन्झचे नाव सामील झाले आहे. काही मिन्झ झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील कावासाकी कंपनीच्या सुपर बाईकवर चालवत असताना त्याचे बाइकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. त्याला गंभीर दुखापत झाली नव्हती. पण तरी त्याला क्रिकेट खेळता येणार नाही, अशी दुखापत नक्कीच झाली आहे. ज्यामुळे तो आता आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे.
कोण आहे रॉबिन मिन्झ?
पहिल्यांदाच आदिवासी क्रिकेटर रॉबिन मिंजला आयपीएलमध्ये खरेदी करण्यात आले होते. त्याला गुजरात टायटन्सने ३.६० कोटी रुपयांना करारबद्ध केले. त्याचे वडील रांची विमानतळावर सुरक्षा रक्षक आहेत. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात शुबमन गिल मिंजच्या वडिलांना भेटला होता. दुर्दैवाने, काही दिवसांनंतर, रॉबिन मिन्झचा अपघात झाला. मिन्झ झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील कावासाकी कंपनीच्या सुपर बाईकवर चालवत असताना त्याचे बाइकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. त्याला गंभीर दुखापत झाली नव्हती. पण आता तरी त्याला क्रिकेट खेळता येणार नाही, अशी दुखापत नक्कीच झाली आहे. ज्यामुळे तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे.
हेही वाचा – IPL 2024 : ‘जे माझ्यासोबत खेळले, ते मला ओळखतात..’, केकेआर कॅम्पमध्ये पोहोचताच गौतम गंभीरचा VIDEO व्हायरल
गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने सांगितले की, ‘आयपीएल २०२३ दरम्यान रॉबिन मिन्झच्या बरे होण्याची शक्यता खूपच कमी आहे.’ रॉबिन मिन्झने झारखंडसाठी अद्याप वरिष्ठ क्रिकेट खेळलेले नाही, परंतु एमएस धोनीने त्याला लोकप्रिय बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. काही आठवड्यांपूर्वी, एक ईसपीएनच्या अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की जर लिलावात रॉबिन मिन्झला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही तर धोनीचा संघ सीएसके संघ त्याला खरेदी करेल. रॉबिन फक्त २१ वर्षांचा आहे आणि आयपीएलमधील त्याच्या पदार्पणाच्या हंगामामुळे तो एक मोठा स्टार बनू शकला असता, परंतु त्याआधी दुखापत होणे ही त्याच्या कारकिर्दीसाठी चांगली बातमी नाही.