पीटीआय, नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी गुजरात टायटन्सने कर्णधार आणि तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संघात कायम ठेवले आहे. त्याच वेळी मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, कोलकाता नाइट रायडर्सने अष्टपैलू शार्दूल ठाकूर आणि फिरकीपटू सुनील नरेन, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लेग-स्पिनर वानिंदू हसरंगा आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
Kagiso Rabada Bat Broke in t20 parts on Lahiru Kumara Ball in SA vs SL 2nd Test Watch Video
SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल
Mitchell Starc Gets His Revenge Against Yashasvi Jaiswal After Being Called Slow Watch Video IND vs AUS
IND vs AUS: ‘स्लो बॉल?’ स्टार्कने पहिल्याच चेंडूवर जैस्वालला बाद करत घेतला बदला, पर्थमध्ये मारला होता टोमणा, पाहा VIDEO
IND vs AUS Why are Australian players wearing black armbands in Adelaide Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीत हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? काय आहे कारण?

‘आयपीएल’मधील दहाही संघांना खेळाडू कायम ठेवण्यासाठी आणि करारमुक्त करण्यासाठी रविवापर्यंतचा (२६ नोव्हेंबर) कालावधी होता. गेल्या काही दिवसांपासून हार्दिकबाबत बरीच चर्चा सुरू होती. ‘आयपीएल’ पदार्पणापासून सात वर्षे मुंबईकडून खेळलेल्या हार्दिकने गेल्या दोन हंगामांत गुजरात संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने २०२२च्या हंगामात जेतेपद, तर २०२३च्या हंगामात उपविजेतेपद मिळवले होते. मात्र, तो आता मुंबई संघात परतण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा होती. परंतु गुजरातने तुर्तास तरी त्याला संघात कायम राखले आहे.

हेही वाचा >>>IPL 2024 Retention: हार्दिक पंड्या तूर्तास गुजरात टायटन्सकडेच

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आर्चरला मुंबई संघाने २०२२च्या हंगामापूर्वी झालेल्या खेळाडू लिलावात ८ कोटी रुपयांत खरेदी केले होते. मात्र, दुखापतीमुळे तो २०२२च्या संपूर्ण हंगामाला मुकला, तर गेल्या हंगामात तो केवळ पाच सामने खेळला. त्यामुळे आता मुंबईने त्याला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आगामी खेळाडू लिलावात मुंबईचा संघ आर्चरला कमी किमतीत पुन्हा खरेदी करण्याचा प्रयत्न करू शकेल.

तसेच कोलकाता संघाने शार्दूलला करारमुक्त करण्याचा अवघड निर्णय घेतला. गेल्या हंगामापूर्वी कोलकाता संघाने शार्दूलला दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खरेदी केले होते. त्याला हंगामामागे १०.७५ कोटी रुपये मिळाले. परंतु ११ सामन्यांत त्याने केवळ सात गडी बाद केले आणि केवळ ११३ धावा केल्या. आता पुढील हंगामात तो नव्या संघाकडून खेळताना दिसेल.

हेही वाचा >>>IPL 2024: मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माला हार्दिक पंड्याच्या रुपात पर्याय शोधतंय का?

खेळाडूंची यादी

मुंबई इंडियन्स

’कायम : रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कॅमरुन ग्रीन, शम्स मुलानी, जसप्रीत बुमरा, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, नेहाल वढेरा, आकाश मधवाल, विष्णू विनोद, जेसन बेहरनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड.

’करारमुक्त : अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकिन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, डुआन यान्सन, झाय रिचर्डसन, रायली मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वॉरियर.

गुजरात टायटन्स

 ’कायम : हार्दिक पंडय़ा, डेव्हिड मिलर, शुभमन गिल,

मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, रशीद खान, जोश लिटल, मोहित शर्मा.

’करारमुक्त : यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दसून शनाका.

लखनऊ सुपरजायंट्स

’कायम : केएल राहुल, क्विंटन डिकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृष्णप्पा गौतम, कृणाल पंडय़ा, काएल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, प्रेरक मंकड, युधवीर सिंह, मार्क वूड, मयंक यादव, मोहसिन खान, रवी बिश्नोई, यश ठाकूर, अमित मिश्रा, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल.

’करारमुक्त : डॅनियल सॅम्स, करुण नायर, जयदेव उनाडकट, मनन वोहरा, करण शर्मा, सूर्याश शेडगे, स्वप्नील सिंग, अर्पित गुलेरिया.

कोलकाता नाइट रायडर्स

’कायम : नितीश राणा,

रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, रहमनुल्ला गुरबाज, सुनील नरेन, जेसन रॉय, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

’करारमुक्त : शाकिब अल हसन, लिटन दास, डेव्हिड व्हिसा, आर्य देसाई, एन. जगदीशन, मनदीप सिंग, कुलवंत खेजरोलिया, शार्दूल ठाकूर, लॉकी फग्र्युसन, उमेश यादव,

टीम साऊदी, जॉन्सन चार्ल्स.

राजस्थान रॉयल्स

’कायम : संजू सॅमसन, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, आवेश खान, यशस्वी जैस्वाल, कुलदीप सेन, संदीप शर्मा, रियान पराग, ध्रुव जुरेल, कुणाल सिंह राठोड, जोस बटलर, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम झ्ॉम्पा, शिमरॉन हेटमायर, डोनोव्हन फरेरा.

’करारमुक्त : मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम आसिफ, आकाश वशिष्ठ, अब्दुल बाझिथ, कुलदीप यादव, जो रूट, जेसन होल्डर, ओबेड मकॉय.

सनरायजर्स हैदराबाद

’कायम : अब्दुल समद, एडीन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, हेन्रिक क्लासन, मयंक अगरवाल, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, अभिषेक शर्मा, मार्को यान्सन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, मयंक मरकडे, उमरान मलिक, टी. नटराजन, फझलहक फरुकी.

’करारमुक्त : हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विव्रत शर्मा, अकेल हुसेन, आदिल रशीद.

चेन्नई सुपर किंग्ज

’कायम : महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉन्वे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीश पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महीश थीकसाना.

’करारमुक्त : बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, अंबाती रायडू, सिसांडा मगाला, काएल जेमिसन, भगत वर्मा, सेनापती, आकाश सिंग.

दिल्ली कॅपिटल्स

’कायम : ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, मिचेल मार्श, आनरिक नॉर्खिए, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, लुंगी एन्गिडी, अभिषेक पोरेल, ललित यादव, यश धूल, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, खलील अहमद.

’करारमुक्त : मनीष पांडे, सर्फराज खान, रायली रुसो, रिपल पटेल, रोव्हमन पॉवेल, अमन खान, प्रियम गर्ग, चेतन साकारिया, मुस्तफिझूर रहमान, फिल सॉल्ट, कमलेश नागरकोटी.

पंजाब किंग्ज

’कायम : शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लििव्हगस्टोन, सॅम करन, सिकंदर रझा, मॅथ्यू शॉर्ट, अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, नॅथन एलिस, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे, ऋषी धवन, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, गुरनूर ब्रार, विद्वथ कवेरप्पा.

’करारमुक्त : भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज धांडा, राज अंगद बावा, शाहरुख खान.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु

’कायम : फॅफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार.

’करारमुक्त : वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन अ‍ॅलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंह, सिद्धार्थ कौल, केदार जाधव.

Story img Loader