IPL 2023 Updates:आयपीएल सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. कारण आयपीएलचा १६वा हंगाम ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. मात्र ही लीग सुरू होण्याआधीच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल लिलावादरम्यान गुजरात टायटन्सने ४.४ कोटी रुपयांना विकत घेतलेला आयर्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोश लिटल जखमी झाला आहे. तो सध्या सुरु असलेल्या पीएसएल २०२३ मधून बाहेर पडला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल लिलावादरम्यान गुजरातने लिटिलला विकत घेतले, जो लीगमधील पहिला आयरिश खेळाडू ठरला होता. २३ वर्षीय लिटल मुलतान सुलतान्ससाठी पीएसएलमध्ये सहभागी होणार होता. परंतु दक्षिण आफ्रिका टी-२० मध्ये प्रिटोरिया कॅप्सकडून खेळताना, त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या जाणवली होती. त्यामुळे आता क्रिकेट आयर्लंडने सांगितले की, सावधगिरी बालगण्यासाठी तो मायदेशी परतला आहे.

IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Shubman Gill injury update ahead Border Gavaskar Trophy
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीतून शुबमन गिल बाहेर? पहिल्या सामन्यापूर्वीच भारताची वाढली डोकेदुखी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
Gautam Gambhir Press conference Team is prepared with Abhimanyu Easwaran and KL Rahul as potential replacements for the opening slot
Gautam Gambhir : रोहित शर्मा नाही तर कोण…? बुमराह नेतृत्व करणार अन् ‘हा’ खेळाडू देणार सलामी, गौतम गंभीरने केलं स्पष्ट

संभाव्य पुनरागमन म्हणून पुढील महिन्यात बांगलादेशमध्ये आयर्लंडच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला लिटल लक्ष्य करत आहे. आयपीएल करार पूर्ण करण्यासाठी तो वेळेत फिटनेस परत मिळवेल अशी अपेक्षा आहे. आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका १८ मार्चपासून सुरू होणार आहे, तर टी-२० मालिका ३१ मार्चपर्यंत चालेल. त्याच दिवशी आयपीएल हंगामाची सुरुवात अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने होईल.

हेही वाचा – ‘पीसीबी अध्यक्ष होण्यासाठी बीए पास व्हावं लागतं…’, Rameez Raja ने Shoaib Akhtar ची काढली लाज

उल्लेखनीय म्हणजे, जोशने २०१६ मध्ये आयर्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तेव्हापासून तो २५ एकदिवसीय आणि ५३ टी-२० खेळला आहे. तो मे २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध डब्लिनमध्ये चर्चेत आळा. त्याने वेगवान गोलंदाजीच्या विनाशकारी स्पेलमध्ये ४५ धावाता देताना ४ विकेट घेतल्या. ज्यामध्ये त्याने कर्णधार इऑन मॉर्गनसह त्यावेळच्या शीर्ष चारपैकी तीन फलंदाजांना शून्यावर बाद केले.

गुजरात टायटन्सचा पूर्ण संघ:

हार्दिक पांड्या (कर्णधार), केन विल्यमसन, अभिनव सदरंगानी, अल्झारी जोसेफ, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, नूर अहमद, शिवम मावी, प्रदीप सांगवान, जोश लिटल, केएस भरत, ओडिन स्मिथ, आर. साई किशोर, राहुल तेवतिया, राशिद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा, यश दयाल, उर्विल पटेल, मोहित शर्मा.