Dance On Jhume Jo Pathan Song Viral Video : महिला प्रिमीयर लीगमध्ये रंगदार सामने होत असून संपूर्ण देशभरात महिला क्रिकेटनं गाजावाजा केला आहे. आयपीएल सुरु होण्याआधीच डब्ल्यूपीएलने हजारो क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या या लीगच्या सामन्यांमध्ये जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचंही हे सामने पाहताना भरभरून मनोरंजन होत आहे. याचसोबत आता सर्व फ्रॅंचायजीची फॅन फॉलोईंग वाढण्यास सुरुवात झाली आहे.
अशातच चाहत्यांच्या मनोरंजनासाठी खेळाडूही सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ व्हायरल करताना दिसत आहेत. गुजरात जायंट्सनेही इंटरनेटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संघाची खेळाडू हर्ले गाला आणि शबनम शकील पठाण चित्रपटाच्या झुमे जो पठाण गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा पठाण चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान गाजला आणि कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवण्यात पठाण चित्रपटाला यश मिळालं. चित्रपटासोबतच गाणीही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली आहेत. अशातच पठाणचं गाणं ‘झुमे जो पठाण’नेही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. कलाकारांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनीच या गाण्याचे रील्स बनवले आहेत.
याचसोबत आता गुजरात जायंट्सनेही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामध्ये हर्ले गाला आणि शबनम शकील ‘झुमे जो पठाण’ गाण्यावर हुक स्टेप करताना दिसत आहेत. दोन्ही महिला खेळाडू सुंदर डान्स करताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. गुजरात जायंट्सने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, काल रात्रीचा सामना जिंकल्यानंतर झालेला मूड…
बुधवारी महिला प्रिमीयर लीगमध्ये आरसीबी आणि गुजरात जायंट्स यांच्यात टूर्नामेंटचा सहावा सामना झाला. गुजरातने या सामन्यात आरसीबीचा ११ धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करून ७ विकेट गमावत २०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीला ६ विकेट्स गमावून १९० धावाच करता आल्या. त्यामुळे आरसीबीचा ११ धावांनी पराभव झाला.