आयपीएल ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मालक गुरुनाथ मयप्पन आणि अभिनेता विंदू दारा सिंग यांना चौकशीसाठी पोलिसांनी रविवारी समोरासमोर आणले. गुरुनाथ आणि विंदू यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाचे नमुने पोलिसांनी गोळा केले असून त्याची चौकशीत नोंद करण्यात आली आहे. रविवारी चौकशीदरम्यान या दोघांना समोरासमोर आणण्यात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Story img Loader