स्पॉटफिक्सिंग प्रकरणात गुरुनाथ मय्यप्पन यांचा हात असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यामुळे त्यांचे सासरे व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्यावर आजीवन बंदी घातली पाहिजे, असे आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी सांगितले.
आयपीएलमधील गैरव्यवहारांबद्दल ललित मोदी यांच्यावर मंडळाने आजीवन बंदी घातली आहे. ते म्हणाले, क्रिकेट संघटकांनी जागे होण्याची वेळ आता आली आहे. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेन्ट कंपनीने केवळ भारतीय नव्हे तर जागतिक क्रिकेटवर आपला कब्जा केला आहे. मय्यप्पन यांना दोषी ठरविण्याच्या अहवालाची मी प्रतीक्षा करीत आहे. ते दोषी ठरल्यामुळे श्रीनिवासन यांचा विजयोत्सवाची शान धुळीस मिळाली आहे.

Story img Loader