Gus Atkinson Record: इंग्लंड वि न्यूझीलंड संघांमध्ये हॅमिल्टनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान इंग्लिश संघाचा युवा गोलंदाज गस ॲटकिन्सन याने मोठा विक्रम रचला आहे. ज्याने, त्याच्या पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात एक अशी चमकदार कामगिरी केली आहे. जी कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात याआधी फक्त एका गोलंदाजाला करता आली होती. ॲटकिन्सनने आपला पहिला कसोटी सामना जुलै महिन्यात खेळला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसोटी क्रिकेटमध्ये ॲटकिन्सनच्या ५० विकेट्स पूर्ण

गस ॲटकिन्सनने जुलै २०२४ मध्ये इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ॲटकिन्सनने कसोटी संघात आपले स्थान कायम राखले आहे आणि आपल्या कामगिरीने देखील सर्वांना प्रभावित केले आहे. ॲटकिन्सनने त्याच्या पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात एक पराक्रम देखील केला जो यापूर्वी केवळ एका गोलंदाजाला करता आला होता. ॲटकिन्सनने हॅमिल्टनमधील न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ३ विकेट्स घेत कसोटी क्रिकेटमधील ५० विकेट्सचा टप्पा गाठला. त्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १९ षटकांत ५५ धावा देत ३ विकेट्स घेतले आहेत.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मावर गाबा कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतल्यामुळे का होतेय टीका?

ॲटकिन्सनला जुलै २०२४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून त्याने ११ कसोटी सामने खेळले आहेत आणि ५० हून अधिक विकेट त्याच्या नावावर केले आहेत. यासह कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या एका कॅलेंडर वर्षात ५० हून अधिक विकेट्सचा टप्पा गाठणार ॲटिकन्सन हा कसोटी इतिहासातील फक्त दुसरा गोलंदाज ठरला आहे. ॲटकिन्सनच्या आधी, कसोटी पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात, फक्त ऑस्ट्रेलियाच्या टेरी अल्डरमन या वेगवान गोलंदाजाने १९८१ मध्ये पदार्पण केले आणि त्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ५४ विकेट घेतले.

हेही वाचा – D Gukesh: गुकेशच्या विश्वविजेतेपदाने रशियाला पोटशूळ; डिंग लिरेनवर केला मुद्दाम हरल्याचा आरोप

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

टेरी अल्डरमन (ऑस्ट्रेलिया) – ५४ विकेट (१९८१)

गस ॲटकिन्सन (इंग्लंड) – आतापर्यंत ५१ विकेट्स (२०२४)

कर्टली ॲम्ब्रोस (वेस्ट इंडिज) – ४९ विकेट (१९८८)

जसप्रीत बुमराह (भारत) – ४८ विकेट (२०१८)

शोएब बशीर (इंग्लंड) – ४७ विकेट (२०२४)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gus atkinson creates history became only 2nd bowler in test cricket history to pick up 50 wickets in debut calendar year eng vs nz bdg