Gus Atkinson Hattrick ENG vs NZ: इंग्लंड वि न्यूझीलंड कसोटीत इंग्लिश संघाच्या गोलंदाजाने मोठी कामगिरी केली आहे. ॲटकिन्सनने भेदक गोलंदाजी करत कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे. क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये सात वर्षांनंतर एका गोलंदाजाने इंग्लंडसाठी हॅटट्रिक घेतली आहे. ॲटकिन्सनने नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि टीम साऊदी यांना लागोपाठ तीन चेंडूत पॅव्हेलियनमध्ये पाठवून हॅट्ट्रिक पूर्ण केली. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या २८० धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या १२५ धावांवर गडगडला.

कसोटीत अनेक गोलंदाजांनी हॅटट्रिक घेतली आहे. जगातील ४४ गोलंदाजांनी आतापर्यंत हॅट्ट्रिक घेतली आहे. त्यापैकी तीन गोलंदाजांना आजवर २-२ वेळा कसोटी हॅटट्रिक घेतली आहे. म्हणजेच कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ४७ हॅटट्रिक घेतल्या गेल्या आहेत. यामध्ये २६ वर्षीय इंग्लंडचा गोलंदाज गस अॅटकिन्सनची हॅटट्रिक ऐतिहासिक ठरली. वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने हॅटट्रिक घेतली आणि हिच या हॅटट्रिकची खासियत आहे.

हेही वाचा – VIDEO: लबुशेनच्या ‘त्या’ कृतीमुळे मोहम्मद सिराज संतापला, थेट चेंडूच मारला फेकून; मैदानात नेमकं काय घडलं?

वेलिंग्टन कसोटीत सलग ३ चेंडूत न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील अखेरचे ३ विकेट गस अ‍ॅटकिन्सनने आपली कसोटी हॅटट्रिक घेतली. यासह, बेसिन रिझर्व्हवर कसोटी हॅटट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. ७ वर्षांनंतर हॅट्ट्रिक घेणारा तो इंग्लंडचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा गस अ‍ॅटकिन्सन हा इंग्लंडचा १४वा गोलंदाज आहे.

गस अ‍ॅटकिन्सनने ३५ व्या षटकात हॅटट्रिक घेतली. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ॲटकिन्सनने प्रथम न्यूझीलंडच्या नॅथन स्मिथला बाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने मॅट हेन्रीला बाद केले आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर टिम साऊदीची विकेट घेत त्याने आपली हॅट्ट्रिक तर पूर्ण केलीच पण किवी संघाचा पहिला डावही संपवला.

हेही वाचा – Harry Brook Century: हॅरी ब्रूकची शतकाची परंपरा कायम, डॉन ब्रॅडमन यांचा मोडला विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

गस अ‍ॅटकिन्सनने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ८.५ षटकांत ३१ धावा देत हॅट्ट्रिकसह ४ विकेट घेतले. या दमदार कामगिरीमुळे न्यूझीलंडचा पहिला डाव १२५ धावांवर मर्यादित असतानाच इंग्लंडलाही १५५ धावांची भक्कम आघाडी मिळाली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही उत्कृष्ट कामगिरी करत मालिका विजय मिळवण्याचे इंग्लिश संघाचे लक्ष्य आहे.

Story img Loader