गुवाहाटी : भारताच्या अनमोल खरब आणि सतीश कुमार करुणाकरण यांनी एकेरीत, तर अश्विनी पोनप्पा-तनिषा क्रॅस्टो जोडीने महिला दुहेरीतून गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
महिला एकेरीत अनमोलने भारताच्याच मानसी सिंहचा २१-१९, २१-१७ असा ४० मिनिटांत पराभव केला. पुरुष एकेरीत सतीश कुमारने चीनच्या सहाव्या मानांकित वँग झेंग शिंगचा १३-२१, २१-१४, २१-१६ असा पराभव केला.
महिला दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा-तनिषा क्रॅस्टो जोडीने चीनच्या केंग शू लिआंग-वँग टिग गे जोडीचे आव्हान २१-१४, २१-१४ असे सहज संपुष्टात आणले.