ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली महिला भारतीय जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरचे त्रिपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. ३६ तासांच्या प्रवासानंतर दीपा गुरुवारी रिओहून दिल्लीत परतली. क्रीडा मंत्रालय आणि भारतीय जिम्नॅस्टिक महासंघातर्फे दीपाला गौरवण्यात आले.
सत्कार सोहळ्यानंतर दीपाचे शुक्रवारी अगरतळा येथील विमानतळावर आगमन झाले, तेव्हा हजारो चाहते उपस्थित होते. दीपाच्या नावाचा जयघोष करत या चाहत्यांनी दीपाचे स्वागत केले. या वेळी त्रिपुरा राज्याचे क्रीडा संचालक दुलाल दास तसेच त्रिपुरा क्रीडा परिषदेचे सचिव दिलीप चक्रवर्ती उपस्थित होते.

Story img Loader