भारताची कलात्मक जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकरने आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत महिला वॉल्ट विभागात कांस्यपदक पटकावले. चीनच्या यॅन वांग हिने १४.९८८ गुणांसह जेतेपद कायम राखले, तर जपानच्या सी मियाकावा हिने १४.८१२ गुणांसह रौप्यपदकावर कब्जा केला. २०१४ च्या राष्ट्रकुल स्पध्रेत कांस्यपदक जिंकणाऱ्या दीपाने १४.७२५ गुणांची कमाई केली आणि तिसरे स्थान पटकावले.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पध्रेत दीपाने त्रिपुरासाठी पाच सुवर्णपदकाची कमाई केली होती. गतवर्षी आशियाई स्पध्रेत दीपाला वॉल्ट प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
दीपा करमाकरला कांस्यपदक
भारताची कलात्मक जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकरने आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत महिला वॉल्ट विभागात कांस्यपदक पटकावले.
First published on: 04-08-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gymnastics dipa karmakar win bronze in asian championships