विश्वविजेता लुईस हॅमिल्टन आणि निको रोसबर्ग यांच्यात जेतेपदासाठी रंगणाऱ्या चुरशीचा नजराणा ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या पात्रता फेरीतच पाहायला मिळाला़ मर्सिडीस संघाच्या या चालकांमध्ये हॅमिल्टनने निम्म्या सेकंदाच्या फरकाने आघाडी घेत रविवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. स्पध्रेत पोल पोझिशन पटकावल़े मेलबर्न अल्बर्ट पार्क सर्किटवर पार पडलेल्या पात्रता फेरीत हॅमिल्टनने एक मिनिट २६.३२७ सेकंदांत लॅप पूर्ण करत जलद वेळ नोंदवली, तर रोसबर्गने एक मिनिट २६.९२१ सेकंदांची वेळ घेतली़
गतवर्षी या स्पध्रेत हॅमिल्टनने प्रथम स्थानावरून शर्यतीची सुरुवात केली होती, परंतु काही तांत्रिक बाबींमुळे त्याला चार फेऱ्यांनंतर माघार घ्यावी लागली़ त्यामुळे यंदा हॅमिल्टन २००८नंतर पहिल्यांदा येथे जेतेपद पटकावण्यासाठी आतुर झाला आह़े रोसबर्गने गतवर्षी ही स्पर्धा जिंकली होती आणि यंदाही त्याची पुनरावृत्ती करण्यास तो सज्ज आह़े
‘‘गतीमध्ये फरक आल्यामुळे पोल पोझिशन हुकले, असे मी म्हणणार नाही़ लुइस जलद होता़ असे असले तरी त्याची चिंता वाटत नाही़ मुख्य शर्यत नेहमी चढउतारांची असते आणि आशा करतो की, उद्या मी बाजी मारेऩ ’’ असा निर्धार रोसबर्ग व्यक्त केला़
यापेक्षा अधिक चांगली सुरुवात होऊच शकत नाही़ निको आणि माझ्यात चांगला ताळमेळ होता़ गेल्या वर्षी येथे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण यंदा हंगामाची दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल आणि आज त्या दिशेने पहिले पाऊल टाकल़े
– लुईस हॅमिल्टन
३९ हॅमिल्टनने आतापर्यंत ३९ वेळा पोल पोझिशन पटकावले आह़े
०४ हॅमिल्टनला ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. स्पध्रेत चौथ्यांदा पोल पोझिशन मिळाली आह़े
युवा चालक
डच चालक मॅक्स वेस्र्टाप्पेनने फॉम्र्युला वनच्या इतिहासात सर्वात युवा चालकाचा मान पटकावला आह़े १७ वर्षे व १६६ दिवसांचा मॅक्स रविवारी हॅमिल्टन, वेटल, रोसबर्ग यांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आह़े पात्रता फेरीत त्याने १२वे स्थान पटकावले आह़े
शर्यतीतील क्रमवारी
लुईस हॅमिल्टन (मर्सिडीज) – १:२६:३२७ मि़
निको रोसबर्ग (मर्सिडीज) – १:२६:९२१ मि़
फेलिप मास्सा (विलियम्स) – १:२७:७१८ मि़
सेबॅस्टियन वेटल (फेरारी ) – १:२७:७५७ मि़
किमी रायकोनेन (फेररी ) – १:२७:७९० मि़
वॉल्टेरी बोट्टास (विलियम्स) – १:२८:०८७ मि़
डॅनिएल रिकीआडरे (रेड बुल) – १:२८:३२९ मि़
कार्लोस सेंझ (टोरो रोसो) – १:२८:५१० मि़
रोमेन ग्रॉसजीन (लोटस) – १:२८:५६० मि़
पॅस्टर माल्डोनाडो (लोटस) – १:२९:४८० मि़
सहारा फोर्स इंडियाच्या चालकांनी या स्पध्रेकरिता पात्रता मिळवली असून निको हल्केनबर्ग १४व्या, तर निका पेरेग १५व्या स्थानावरून शर्यतीची सुरूवात करतील़