विश्वविजेता लुईस हॅमिल्टन आणि निको रोसबर्ग यांच्यात जेतेपदासाठी रंगणाऱ्या चुरशीचा नजराणा ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या पात्रता फेरीतच पाहायला मिळाला़ मर्सिडीस संघाच्या या चालकांमध्ये हॅमिल्टनने निम्म्या सेकंदाच्या फरकाने आघाडी घेत रविवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. स्पध्रेत पोल पोझिशन पटकावल़े मेलबर्न अल्बर्ट पार्क सर्किटवर पार पडलेल्या पात्रता फेरीत हॅमिल्टनने एक मिनिट २६.३२७ सेकंदांत लॅप पूर्ण करत जलद वेळ नोंदवली, तर रोसबर्गने एक मिनिट २६.९२१ सेकंदांची वेळ घेतली़
गतवर्षी या स्पध्रेत हॅमिल्टनने प्रथम स्थानावरून शर्यतीची सुरुवात केली होती, परंतु काही तांत्रिक बाबींमुळे त्याला चार फेऱ्यांनंतर माघार घ्यावी लागली़ त्यामुळे यंदा हॅमिल्टन २००८नंतर पहिल्यांदा येथे जेतेपद पटकावण्यासाठी आतुर झाला आह़े रोसबर्गने गतवर्षी ही स्पर्धा जिंकली होती आणि यंदाही त्याची पुनरावृत्ती करण्यास तो सज्ज आह़े
‘‘गतीमध्ये फरक आल्यामुळे पोल पोझिशन हुकले, असे मी म्हणणार नाही़ लुइस जलद होता़ असे असले तरी त्याची चिंता वाटत नाही़ मुख्य शर्यत नेहमी चढउतारांची असते आणि आशा करतो की, उद्या मी बाजी मारेऩ ’’ असा निर्धार रोसबर्ग व्यक्त केला़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा