धोकादायक वातावरणात झालेल्या जपानी ग्रां.प्रि. स्पर्धेविषयी उलटसुलट चर्चा रंगत असतानाच सोची, रशिया येथे झालेल्या रशियन ग्रां.प्रि. फॉम्र्युला वन शर्यतीत मर्सिडीझच्या ल्युइस हॅमिल्टनने बाजी मारली. यंदाच्या हंगामातले हॅमिल्टनचे हे सलग चौथे जेतेपद आहे. २९वर्षीय हॅमिल्टनने पोल पोझिशनवरुन शर्यतीला सुरुवात केली. संघसहकारी निको रोसबर्गला १३.६५७ सेकंदांनी मागे टाकत हॅमिल्टनने अव्वल स्थान पटकावले. हॅमिल्टनचे हे कारकिर्दीतील नववे जेतेपद आहे. रोसबर्गने दुसरे तर विल्यम्सच्या फिन वलटॅरी बॉटसने तिसरे स्थान पटकावले.

Story img Loader