Hanuma Vihari’s AP Captaincy Reveal : एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या हनुमा विहारीने सोशल मीडियावर एक पोस्ट करुन खळबळ उडवून दिली आहे. त्याने रणजी ट्रॉफीतील आंध्र प्रदेशचे कर्णधारपदावरुन हटवल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. हनुमा विहारीला गेल्या महिन्यात रणजी ट्रॉफीमध्ये आंध्रच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्याला हटवल्यानंतर व्हीनस रिकी भुईने संघाची कमान सांभाळली. हनुमा विहारीने आता आंध्र प्रदेशकडून कधीही खेळणार नसल्याचे सांगितले आहे. संघटनेशी त्याचे संबंध बिघडल्याचे त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

नेत्याच्या मुलावर ओरडल्यामुळे कर्णधारपदावरुन हटवले –

हनुमा विहारीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करताना लिहले की, तो आंध्र प्रदेशसाठी कधीही क्रिकेट खेळणार नाही. कर्णधारपदावरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताना, तो म्हणाला की रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यानंतर त्याला कर्णधारपदावरून जबरदस्तीने काढून टाकण्यात आले होते. हा निर्णय संघटनेचा होता. त्याने सांगितले की एका सामन्यात तो एका खेळाडूवर ओरडला होता आणि तो खेळाडू एका राजकीय नेत्याचा मुलगा होता.

IND vs AUS Adam Gilchrist and Michael Vaughan slams Australia for 'negative, illegal' tactics against India in first Test
IND vs AUS : ‘तुम्ही कधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सना असं पाहिलंय का?’, ॲडम गिलख्रिस्टकडून संघाच्या नकारात्मक रणनीतीवर मोठंं वक्तव्य
Ipl 2025 Auction All 10 Teams Purse Remaining And Slots Available After Day 1 RCB MI PBKS With Most Money
IPL Auction 2025: IPL लिलावाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या…
IPL 2025 Auction: Which Teams Got Their Captains on 1st Day of Mega Auction?
IPL Auction 2025: पहिल्याच दिवशी ‘या’ ४ संघांना मिळाला कर्णधार, तीन खेळाडू ठरले IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
Virat Kohli breaks Sachin Tendulkar's record for most catches in Tests for India
Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा पराक्रम! शतकी खेळीनंतर ‘या’ बाबतीतही सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
gukesh and ding battle for world chess championship 2024 title
बुद्धिबळ जगज्जेतेपद लढत आजपासून; गुकेशच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात डिंग लिरेनचा अडथळा!
Sherfan Rutherford scored a century in the Abu Dhabi T10
Sherfane Rutherford : १० षटकांच्या सामन्यातही शतक! शेरफन रुदरफोर्डची कमाल
Zimbabwe beat Pakistan by 80 Runs DLS Method Defeat Shocks Mohammed Rizwan And Team ZIM vs PAK 1st ODI
ZIM vs PAK: पाकिस्तानला झिम्बाब्वेचा दणका; ८० धावांनी मिळवला खळबळजनक विजय
Mumbai Indians Bought Trent Boult with 12 05 crores in IPL Auction 2025
Trent Boult MI: मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी

कोणतीही चूक न नसताना कर्णधारपदावरून हटवण्यात आले –

हनुमा विहारी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही शेवटपर्यंत खूप संघर्ष केला पण हे घडणे नशिबात नव्हते. आंध्रसह आणखी एक उपांत्यपूर्व सामनागमावल्याचे दुःख आहे. ही पोस्ट मी पुढे मांडू इच्छित असलेल्या काही तथ्यांबद्दल आहे. बंगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी कर्णधार होतो, त्या सामन्यादरम्यान मी १७ वर्षीय खेळाडूवर ओरडलो होतो. यानंतर त्या खेळाडूंने त्याच्या वडिलांकडे (जो राजकारणी आहे) तक्रार केली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी असोसिएशनला माझ्यावर कारवाई करण्यास सांगितले. ज्यामुळे माझी कोणतीही चूक न नसताना असोसिएशनने मला कर्णधारपदावरून हटवले.”

हेही वाचा – Hardik Pandya : आयपीएलपूर्वी हार्दिक पंड्याचे क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन, ‘या’ संघाचे करतोय नेतृत्त्व

आता आंध्रप्रदेशसाठी कधीही खेळणार नाही –

हनुमा विहारी यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “मी कधीही कोणत्याही खेळाडूला वैयक्तिकरित्या काहीही बोललो नाही, परंतु असोसिएशनला असे वाटले की गेल्या वर्षी ज्याने आपले शरीर पणाला लावले आणि डावखुरी फलंदाजी केली, त्यापेक्षा तो खेळाडू अधिक महत्त्वाचा आहे. गेल्या ७ वर्षात आंध्र प्रदेशला ५ वेळा बाद फेरीत नेले. मला खूप लाज वाटली, पण मी या हंगामात खेळणे सुरू ठेवण्याचे एकमेव कारण म्हणजे मी माझ्या संघाचा आदर करत होतो, पण आंध्रसाठी पुन्हा कधीही खेळणार नाही.”