भारतीय क्रिकेटपटू हनुमा विहारी याचे आंध्र प्रदेश क्रिकेट संघ व्यवस्थापनाशी झालेले वाद सर्वश्रुत आहेत. या वादामुळे हनुमा विहारी गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटपासून दूर आहे. आंध्र प्रदेश क्रिकेट व्यवस्थापनाबरोबर झालेल्या वादामुळे त्याला आंध्रच्या संघातून खेळण्याची संधी मिळत नव्हती. तसेच आंध्र क्रिकेट असोसिएशनने (एसीए) ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) न दिल्याने हनुमाला इतर कोणत्याही संघाकडून खेळता येत नव्हतं. मात्र आता एसीएने हनुमाला हे प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे तो इतर संघांकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसू शकतो.
एसीएने हनुमाची कर्णधारपदावरून उचलबांगडी केल्यानंतर त्याने संघ व्यवस्थापन आणि एसीएवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे हा वाद वाढत गेला. परिणामी हनुमाने आंध्र प्रदेश संघाकडून खेळण्यास नकार दिला. त्यानंतर एसीएने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
दरम्यान, मंगळवारी (४ जून) लोकसभा निवडणुकीच्या निकालासह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर झाला. आंध्र प्रदेशमध्ये सत्तांतर झालं आहे. राज्यात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसची धुळधाण उडाली आहे. राज्यात एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीने १३५, अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीने २१, जगन मोहन रेड्डींच्या पाक्षाने ११ आणि भारतीय जनता पार्टीने आठ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यात तेलुगू देशम पार्टी आणि जनसेना पार्टी मिळून सरकार स्थापन करणार आहेत.
निवडणुकीच्या निकालानंतर हनुमा विहारीने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “गेल्या दोन महिन्यांपासून मी एनओसीची मागणी करत होते. अखेर सोमवारी मला एनओसी मिळालं.” देशांतर्गत क्रिकेटमधून एका खेळाडूला दुसऱ्या राज्याच्या किंवा इतर संघाकडून क्रिकेट खेळायचं असेल तर त्याला त्याच्या राज्यच्या संघ व्यवस्थापनाकडून एनओसी घ्यावं लागतं.
हनुमाने आंध्र प्रदेशमधील तेलुगू देशम पार्टीच्या विजयाचा उल्लेख करत म्हटलं आहे की, “मी दोन महिन्यांपासून एनओसी मागत होतो. मी त्यांना चार वेळा ई-मेल केला. परंतु, त्यांनी मला एनओसी दिलं नाही. आता राज्यातलं चित्र बदललं असून मला लगेचच एनओसी मिळालं.”
हे ही वाचा >> विश्वचषक मोहिमेस प्रारंभ! भारताची आज आयर्लंडशी सलामी; रोहित-कोहली जोडीकडे लक्ष
हनुमा विहारीची कारकीर्द
हनुमा विहारीने १६ कसोटीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. या १६ कसोटीत हनुमाच्या नावावर ३३.५६च्या सरासरीने ८३९ धावा आहेत. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. २०१९ मध्ये हनुमाने वेस्ट इंडिजविरुद्ध १११ धावांची शानदार खेळी साकारली होती. २०२०-२१ भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी टेस्टमध्ये हनुमा आणि रवीचंद्रन अश्विन यांनी 258 चेंडूत नाबाद ६२ धावांची अभेद्य भागीदारी साकारत पराभव टाळला होता. मांडीच्या स्नायूंना दुखापत होऊनही हनुमाने १६१ चेंडूत २३ धावांची चिवट खेळी साकारली होती.