MS Dhoni Bikes : असं म्हणतात, ‘प्रेमात असलेला माणूस आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करू शकतो. मग ते रात्री चोरून भेटणं असो किंवा मग शाहजानसारखं ताजमहालाची निर्मिती करणं असो.’ प्रेमापोटी जगावेगळ्या गोष्टी करणाऱ्या लोकांची अनेक उदाहरणं आपण बघितली असतील. भारतीय क्रिकेटमध्ये देखील असाच एक प्रेमवेडा आहे. या प्रेमवेड्याचं नाव आहे, महेंद्रसिंह धोनी! भारतीय संघाचा माजी कर्णधार असलेला धोनी कुण्या व्यक्तीच्या नाहीतर मोटारसायकलच्या प्रचंड प्रेमात आहे. त्याने आपल्या मोटारसायकलींसाठी एक आलिशान गॅरेजही बांधलेलं आहे.

महेंद्रसिंह धोनीचे मोटारसायकल प्रेम वेळोवेळी उघडपणे दिसलेलं आहे. त्यांच्या खरेदीसाठी त्याने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये कॉन्फिडरेट हेलकास्ट एक्स १३२, डुकाटी १०९८, कवासाकी निंजा झेडएक्स१४आर, हार्ले डेव्हिडसन फॅटबॉय, यमाहा वायझेडएफ६०० थंडरकास्ट यांसारख्या आलिशान मोटारसायकल आहेत.

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Marathi actress Amruta Deshmukh was welcomed on the sets of Maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुखचं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर झालं ‘असं’ स्वागत, म्हणाली, “ओंकार राऊतने…”
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…

हेही वाचा – IND vs WI ODI Series : ‘विश्रांती दिली तर फॉर्म परत येईलच कसा?’ विराट आणि रोहितला वगळल्याने माजी भारतीय गोलंदाजाने उपस्थित केला प्रश्न

गाड्यांसोबत वेळ घालवण्याची आवड

धोनी मोटारसायकलचा प्रचंड शौकीन आहे. त्याला केवळ गाड्या चालवायलाच नाही तर त्यांची निगा राखणेही प्रचंड आवडते. तो आपल्या आलिशान गॅरेजमध्ये गाड्यांची कशी काळजी घेतो, याची झलक त्याच्या जीवनपटामध्येही दाखवण्यात आलेली आहे. आपल्या सर्व मोटारसायकलसोबत त्याचे भावनिक बंध तयार झालेले आहेत. काही वर्षांपूर्वी त्याने आपली पहिली गाडी असलेली राजदूत स्वतः दुरुस्त केली होती.

हेही वाचा – ICC Test Rankings : गेल्या सहा वर्षांपासून ‘टॉप-१०’मध्ये असलेल्या ‘किंग’ फलंदाजाच्या क्रमवारीत मोठी घसरण

स्वत: खरेदी केलेल्या गाड्यांव्यतिरिक्त क्रिकेट सामन्यांमध्ये सामनावीर म्हणून मिळालेल्या सर्व मोटारसायकल त्याने जपून ठेवल्या आहेत. २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध सामनावीर म्हणून जिंकलेल्या मोटारसायकलवरून युवराज सिंगसोबत मैदानात चक्कर मारलेला धोनी आजही अनेकांना आठवत असेल. अनेक सेलिब्रिटी तक्रार करतात की, चाहत्यांच्या नजरेत येण्याच्या भीतीमुळे त्यांना आवड असूनही मोटारसायकलवरून फिरता येत नाही. धोनी मात्र, याला अपवाद ठरतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा रांची आणि चेन्नईच्या रस्त्यांवरून बिनधास्तपणे मोटारसायकल चालवताना दिसतो.

Story img Loader