भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. त्याने आज ३४ व्या वर्षात पदार्पण केले. सध्या देशभरात लॉकडाउन चालू असल्याने त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. त्यामुळे रोहितचे सारे चाहते आणि संघ सहकारी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. रोहित शर्माने भारतासाठी अनेक उपयुक्त खेळी केल्या आहेत. त्यात रोहितने क्रिकेट इतिहासात कोणालाही न जमलेला पराक्रम केला आहे.

Video : रोहितने ‘मुंबई इंडियन्स’विरूद्ध घेतली होती हॅटट्रिक

विक्रमी रोहितचा धमाकेदार पराक्रम

१५ जून २०१७ ला ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहितने नाबाद १२३ धावांची खेळी केली. त्याने बांगलादेश विरूद्ध १२९ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकार लगावत हे शतक साकारले होते. त्यानंतर रोहितने विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नाबाद १२२ धावांची खेळी केली. तर ICC कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून खेळताना रोहित शर्माने नाबाद १७६ धावांची दमदार खेळी केली. रोहित शर्माने सलामीवीर म्हणूनच पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याचसोबत ICC च्या स्पर्धांमध्ये त्याने एक विशेष विक्रम केला. ICC च्या तीन मोठ्या स्पर्धांमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरला. रोहितने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ICC एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत शतक लगावले होते. त्यानंतर रोहितने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळण्यात आलेल्या आजच्या कसोटी सामन्यात शतक लगावले.

HBD Rohit : मुंबई इंडियन्सने लाडक्या ‘हिटमॅन’ला दिल्या हटके शुभेच्छा

HBD Rohit : WC2019 मध्ये हिटमॅन ठरला होता ‘जगात भारी’

दरम्यान, त्याने आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत रोहितने दोन शतके आणि एक द्विशतक ठोकले होते. पहिल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावा ठोकल्या होत्या. तर तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात रोहितने २१२ धावा कुटल्या होत्या. ही मालिका भारताने ३-० अशी जिंकली होती.

Story img Loader