भारतीय संघाचा निर्धारित षटकांच्या सामन्यांचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. त्याने आज ३३ व्या वर्षात पदार्पण केले. सध्या देशभरात लॉकडाउन चालू असल्याने त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. त्यामुळे रोहितचे सारे चाहते आणि संघ सहकारी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. रोहित शर्माने भारतासाठी अनेक उपयुक्त खेळी केल्या आहेत. त्यापैकी विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये त्याने अफलातून कामगिरी केली होती.

…तर पाकिस्तानला सेहवागपेक्षा भारी फलंदाज मिळाला असता – अख्तर

विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने शतक ठोकले होते. या स्पर्धेतील हे रोहितचे पाचवे शतक ठरले होते. त्या आधी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नाबाद १२२ , पाकिस्तानविरूद्ध १४० , इंग्लंडविरूद्ध १०२ आणि बांगलादेशविरूद्ध १०४ धावांची शतकी खेळी केली होती. मात्र श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याने ठोकलेले शतक विशेष ठरले होते. श्रीलंकेविरूद्ध त्याने १०३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत ५ शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज होण्याचा बहुमान रोहितने पटकावला होता.

“तू तर करोना व्हायरसपेक्षाही घातक…”; ख्रिस गेलचा संताप

रोहितने विश्वचषक स्पर्धेत एकूण ९ सामने खेळले. त्या सामन्यात त्याने ९८ च्या स्ट्राईक रेटने आणि ८१ च्या सरासरीने ६४८ धावा ठोकल्या होत्या. या ६४८ धावांमध्ये पाच शतके आणि एक अर्धशतक सामील होते. त्याने सर्वोत्तम १४० धावांची खेळी करून दाखवली होती. पण, दुर्दैवाने भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंड संघाने भारताला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली होती.

आता पश्चात्ताप करण्यावाचून हाती काही उरलं नाही – जावेद मियाँदाद 

अंतिम फेरीत मात्र न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यात देखील सामन्याचा निकाल लागला नव्हता, अखेर चौकार-षटकारांच्या संख्येवर इंग्लंड विश्वविजेता बनला होता.

Story img Loader