टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर आणि IPL मधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस आहे. रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ ला नागपूरमध्ये झाला. आज रोहितने ३४ व्या वर्षात पदार्पण केले. पण सध्या देशभरात लॉकडाउन चालू असल्याने रोहितचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे अनेक चाहत्यांचे स्वप्न यंदाच्या वर्षी अर्धवट राहिले. त्यामुळे रोहितचे सारे चाहते आणि संघ सहकारी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. रोहित शर्माने IPL मध्ये मुंबईचे दीर्घ काळापासून प्रतिनिधित्व केले. त्याच्या नेतृत्वाखालीच IPL च्या ४ पैकी ३ विजेतेपदांवर मुंबई इंडियन्सने नाव कोरले. २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ अशी सर्वाधिक चार विजेतेपदे मुंबईकडे आहेत. त्यामुळेच मुंबई इंडियन्स संघाने आपल्या लाडक्या रोहित शर्माला खास आणि काहीशा हटके शुभेच्छा दिल्या.
“तू तर करोना व्हायरसपेक्षाही घातक…”; ख्रिस गेलचा संताप
रोहित शर्मासाठी दरवर्षी मुंबइ इंडियन्स संघाकडून खास गिफ्ट आणि मेजवानी असते कारण त्या काळात सहसा IPL सुरू असते आणि सारे खेळाडू एकत्रच असतात. पण यंदा करोनामुळे IPL चे आयोजन लांबणीवर टाकण्यात आले असून सारे खेळाडू आपापल्या घरात आहेत. अशा वेळी सारे जण शुभेच्छांसाठी सोशल मिडियाचा आधार घेत आहेत. रोहितला मुंबई इंडियन्सने देखील खास शुभेच्छा ट्विटरवरून दिल्या आहेत. सामान्यत: उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थन आपण एखाद्याच्या वाढदिवशी करतो. पण मुंबई इंडियन्सने काहीशा हटके प्रकारे त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित, तुला अजून जास्त चौकार, षटकार, नवनवे विक्रम आणि खूप साऱ्या ट्रॉफी मिळोत, अशा आशयाच्या शुभेच्छा त्यांनी लाडक्या हिटमॅनला दिल्या आहेत.
HBD Rohit : WC2019 मध्ये हिटमॅन ठरला होता ‘जगात भारी’
पाहा खास शुभेच्छा-
As the clock strikes, we wish our Captain – our Leader more boundaries, more sixes, more runs, more records and many more trophies
Paltan, send out your wishes with #HitmanDay #HappyBirthdayRohit #OneFamily @ImRo45 pic.twitter.com/Gflye8ZyVq
— Mumbai Indians (@mipaltan) April 29, 2020
रोहित शर्माची IPL कारकिर्द
रोहितने आतापर्यंत १८८ IPL सामन्यात १३० च्या स्ट्राईक रेटने आणि ३१.६० च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत. रोहितची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या १०९ आहे. त्याने आतापर्यंत ३६ अर्धशतके आणि १ शतक ठोकले आहे. याशिवाय त्याने ४३१ चौकार आणि १९४ षटकार खेचले आहेत. IPL च्या २०१३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना तर २०१५, २०१७ आणि २०१९ च्या हंगामात संघाचे नेतृत्व करताना त्याने विजेतेपदाची चव चाखली.