IPL मधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ ला नागपूरमध्ये झाला. आज रोहितने ३४ व्या वर्षात पदार्पण केले. देशभरात लॉकडाउन असल्याने रोहितचे सारे चाहते आणि संघ सहकारी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. रोहित शर्माने IPL मध्ये मुंबईचे दीर्घ काळापासून प्रतिनिधित्व केले. त्याच्या नेतृत्वाखालीच IPL च्या ४ पैकी ३ विजेतेपदांवर मुंबई इंडियन्सने नाव कोरले. पण एक मजेशीर गोष्ट म्हणजे रोहितने IPL कारकिर्दीतील एकमेव हॅटट्रिक मुंबईविरूद्धच घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

HBD Rohit : मुंबई इंडियन्सने लाडक्या ‘हिटमॅन’ला दिल्या हटके शुभेच्छा

रोहितच्या नावावर गोलंदाज म्हणून एका हॅटट्रिकची नोंद आहे. त्याने २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळत असताना मुंबई इंडियन्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. सर्वप्रथम रोहितने अभिषेक नायरला एका धावेवर बाद केले होते. पुढच्याच चेंडूवर त्याने हरभजनलाही शून्यावर त्रिफळाचीत केले होते आणि त्याचे षटक संपले होते. त्यावेळी मुंबईला २४ चेंडूत ४३ धावांची आवश्यकता होती. अनुभवी जे पी ड्युमिनी मैदानावर तळ ठोकून होता. अर्धशतक करून तो खेळत होता. पण रोहितने पुढच्याच षटकातील पहिल्या चेंडूवर ड्युमिनीला किपरकरवी झेलबाद केले होते. रोहितच्या हॅटट्रिकमुळे तो सामना मुंबईला गमवावा लागला होता.

HBD Rohit : WC2019 मध्ये हिटमॅन ठरला होता ‘जगात भारी’

रोहित शर्माची IPL कारकिर्द

रोहितने आतापर्यंत आधी डेक्कन चार्जर्स आणि नंतर मुंबई इंडियन्स यांच्याकडून खेळताना एकूण १८८ IPL सामन्यात १३० च्या स्ट्राईक रेटने आणि ३१.६० च्या सरासरीने ४८९८ धावा केल्या आहेत. रोहितची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या १०९ आहे. त्याने आतापर्यंत ३६ अर्धशतके आणि १ शतक ठोकले आहे. याशिवाय त्याने ४३१ चौकार आणि १९४ षटकार खेचले आहेत. IPL च्या २०१३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना तर २०१५, २०१७ आणि २०१९ च्या हंगामात संघाचे नेतृत्व करताना त्याने विजेतेपदाची चव चाखली.