77th Independence Day: संपूर्ण भारत आज ७७वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सुरेश रैना, कपिल देव, इरफान पठाण आणि इतर अनेक क्रिकेटपटूंनी ट्वीटरवर भारतीय नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय क्रिकेट संघासाठी ही ७ वर्षे अद्भूत ठरली असून या काळात टीम इंडियाने अनेक विक्रम नोंदवले आहेत.

१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. लाखो लोक या खेळाच्या प्रेमात पडल्यामुळे भारतीय क्रिकेटचा मार्ग कायमचा बदलला. सचिन रमेश तेंडुलकरने १९८९ मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तो या खेळातील महान फलंदाजांपैकी एक बनला. २००७मध्ये, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली युवा भारताने प्रथमच टी२० विश्वचषक जिंकला.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

टीम इंडियाने त्यानंतर तब्बल, २८ वर्षांनंतर म्हणजेच २०११मध्ये, एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चाहत्यांना पुन्हा एकदा आनंद साजरा करण्याची संधी दिली. कारण, भारताने दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला पण धोनी गेल्यानंतर भारताला आतापर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आता प्रत्येकाला भारताकडून अपेक्षा असेल की, या वर्षी म्हणजे २०२३मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत आशिया कप आणि विश्वचषक जिंकेल.

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारे खेळाडू

१९४७ साली आजच्याच दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. आज भारत खेळापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत नवीन उंची गाठत आहे. भारताची अर्थव्यवस्थाही सातत्याने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत देशात क्रिकेटला नव्या उंचीवर नेणाऱ्या खेळाडूंनीही तमाम देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

हरभजन सिंग यांनी लिहिले “भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करूया आणि देशाला शांतता, सौहार्द आणि प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा संकल्प करूया. आपल्या प्रत्येक पाऊलाने आपण राष्ट्रासाठी योगदान देत आहोत याची खात्री केली पाहिजे.”

हेही वाचा: IND vs IRE: स्वातंत्र्य दिनी टीम इंडिया झाली आयर्लंडला रवाना, बुमराह सांभाळणार संघाची कमान; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

व्हीव्हीएस लक्ष्मण याने लिहिले “ज्यांच्या बलिदानामुळे आपण हा दिवस साजरा करू शकलो त्या सर्वांना मी प्रणाम करतो. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा २०२३.” त्याचा फोटो शेअर करत आकाश चोप्राने लिहिले, “जय हिंद. जय भारत. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.” विराट कोहलीने लिहिले “सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद” अजिंक्य रहाणेने लिहिले “आपण आपल्या देशाचा ७७वा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या विकास, सद्भावना आणि समृद्धीचा एकत्रित प्रवास सुरू करूया. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद!”

Story img Loader