स्नूकर आणि बिलियर्ड्स या दोन्ही खेळांमध्ये योग्य ताळमेळ राखल्याचा आनंद होत आहे, असे मत भारताचा दिग्गज स्नूकर व बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने व्यक्त केले. इजिप्त येथे नुकत्याच पार पडलेल्या आयबीएसएफ विश्व स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत अडवाणीने चीनच्या १८ वर्षीय झुआ झिटाँगचा पराभव करून जेतेपद पटकावले होते. कारकीर्दीतील त्याचे हे स्नूकर प्रकारातील चौथे , तर बिलियर्ड्समधील ११वे जगज्जेतेपद आहे. या दोन्ही प्रकारांत ताळमेळ राखणे सोपे नसल्याची कबुली त्याने दिली. तो म्हणाला, ‘‘वर्षांनुवष्रे ती स्पर्धात्मक खेळ खेळत आहे. स्नूकर आणि बिलियर्ड्स दोन्हीमध्ये यश प्राप्त करीत असल्याचा आनंद निराळाच आहे.’’ २००३मध्ये स्पर्धात्मक पदार्पणातच अडवाणीने आयबीएसएफ विश्व स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत बाजी मारली होती. या दोन्ही खेळातील दिग्गज म्हणून आपली ओळख बनेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा