दुबईत सध्या आशिया चषक स्पर्धा सुरू आहे. यादरम्यान भारत पाकिस्तान या दोन्ही संघातील खेळाडूंच्या भेटीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि भारतीय खेळाडूंच्या भेटीचा, तसेच रोहित शर्माचा पाकिकस्तान चाहत्यांबरोबरच्या भेटीचा व्हिडीओ समोर आला होता. तसेच रोहित शर्मा आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये एकमेकांविषयी आदर दिसत असला, तरी शाहिद आफ्रिदीच्या एका वक्तव्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. त्यावर हरभजन सिंग हसल्याने यावरून दोघांनाही नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.
नेमकं आहे प्रकरण?
रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आजतक या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना शाहिद आफ्रिदीने भारतीय संघात गौतम गंभीर कोणालाच आवडत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर हरभजन सिंग जोरदार हसायला लागला. दरम्यान, यावरून आता वाद सुरू झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी दोघांनाही सुनावले आहे.
हेही वाचा – Video: ६ चेंडूत ६ षटकार ठोकत पुन्हा रचला इतिहास; आशिया चषकापेक्षा ‘या’ खेळाडूची होतेय जास्त चर्चा
एका युजरने ट्वीट करत लिहीले, ”आफ्रिदीने आपल्या भारतीय क्रिकेटरची खिल्ली उडवली. तेव्हा हरभजन हसला लागला. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. त्याने सर्व भारतीयांची माफी मागितली पाहिजे.
तर दुसऱ्या एका युजरने लिहीले, ”हरभजन सिंग असा व्यक्ती आहे. जो नेहमीच आफ्रिदीच्या पाठीशी उभा राहिला आहे. तर गौतम गंभीर पाकिस्तानी लोकांचा सामना नेहमीत तयार असतो. मला भारतीय संघाबद्दल माहिती नाही, पण भारतीयांना गंभीर आवडतो”