Harbhajan Singh advised the Indian team to play freely and not under pressure: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या दुसऱ्या दिवसापर्यंत भारतीय संघ बॅकफूटवर होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने १५१ धावांवर ५ विकेट गमावल्या. भारताचा अव्वल फलंदाजी क्रम पूर्णपणे फ्लॉप ठरला. भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने या सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे खेळण्याची गरज असल्याचे हरभजनने म्हटले आहे.

हरभजन सिंगच्या मते टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये कशाचीही कमतरता नाही. त्यांना फक्त धोरणात्मक बदलाची गरज आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हरभजन म्हणाला की, “कशाचीही कमतरता नाही. जेव्हा तुम्ही मोठ्या सामन्यांमध्ये खेळता तेव्हा चांगली कामगिरी करण्याची गरज असते.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Image of protesters at the MCG
Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटीत खलिस्तान्यांचा राडा, भारतीय प्रेक्षकांनी दिले जशास तसे उत्तर
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

मोठ्या सामन्यांमध्ये मुक्तपणे खेळण्याची गरज –

हरभजन पुढे म्हणाला, “मला वाटते मोठ्या सामन्यांमध्ये मुक्तपणे खेळण्याची गरज आहे. आता स्पर्धा खूप चुरशीची होणार आहे. निकालाचा विचार न करता मोकळेपणाने खेळले पाहिजे.” हरभजन सिंग अंतिम सामन्यात कॉमेंट्री करत आहे. सामना पाहता खेळाडूंनी जास्त दडपण घेऊन खेळू नये, असेही तो म्हणाला होता.

हेही वाचा – WTC Final IND vs AUS: द्रविड-लक्ष्मणचे उदाहरण देताना सुनील गावसकरांनी दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाले, “टीम इंडियाने …”

भारतीय संघाचा पहिला डाव –

लंडनमधील ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून १५१ धावा केल्या आहेत. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २६९ धावा म्हणजे आणखी ११८ धावा करायच्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे नाबाद २९ धावा आणि श्रीकर भरत पाच धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आहेत. म्हणजेच भारतीय संघ अजूनही आपल्या धावसंख्येने ३१८ धावांनी मागे आहे.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final 2023: विराट कोहलीबद्दलच्या प्रश्नावर सौरव गांगुलीने दिले उत्तर, म्हणाला, “तो असा खेळाडू आहे, ज्याला…”

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या –

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १६३ धावांची खेळी केली. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने १२१ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २८५ धावांची भागीदारी केली. अॅलेक्स कॅरीने ४८ आणि डेव्हिड वॉर्नरने ४३ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. मिचेल स्टार्क धावबाद झाला.

Story img Loader