हरभजन सिंगच्या ११व्या षटकात सौरभ तिवारीने मारलेला फटका अडवण्याचा अंबाती रायुडूने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र चेंडू सीमारेषेपलीकडे गेला. चौकाराची नोंद झाल्याने चिडलेल्या हरभजनने रायुडूला उद्देशून आक्षेपार्ह शब्द उच्चारले. रायुडूनेही हरभजनला शाब्दिक प्रत्युत्तर दिले. त्यानंतर हरभजनने रायुडूजवळ जाऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंमध्ये बिनसल्याची चर्चा गहुंजेत रंगली होती.
मार्शची माघार
रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला दुखापतीमुळे आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिचेल मार्शने स्नायूंच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.