Harbhajan Singh Revealed:भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने एक महत्वाचा खुलासा केला. तो म्हणाला राजकारणात येण्यापूर्वी त्याने त्याचा जवळचा मित्र आणि फलंदाज सचिन तेंडुलकरचा सल्ला घेतला होता. सचिन तेंडुलकर २०१२ ते २०१८ या काळात राज्यसभा सदस्य राहिला आहे. हरभजन सिंग सध्या आम आदमी पक्षाकडून (आप) राज्यसभा सदस्य आहे. हरभजन सिंगने इंडियन एक्स्प्रेससोबतच्या एका आइडिया एक्सचेंज सेशन दरम्यान ही माहिती दिली.
हरभजन म्हणाला, “मला पाजी (तेंडुलकर) बद्दल सर्वात जास्त आदर आहे. त्याने मला आरामाची अनुभूती दिली आहे. क्रिकेट खेळताना आम्ही खूप जवळ आलो. कारण तिथे ते आरामदायक होते. मला वाटते की, त्यांनीही माझ्या सहवासाचा आनंद घेतला. मग मी त्यांच्याशी पंजाबी मध्ये बोलू लागलो आणि आम्हा दोघांना एकमेकांशी बोलण्यात मजा येऊ लागली.”
मला जेव्हा सल्ला हवा असेल तेव्हा मी पाजीकडे जातो –
हरभजन म्हणाला, “मला कधी सल्ला हवा असेल तर मी नेहमी त्यांच्याकडे जातो. राज्यसभेत येण्यापूर्वीही मी त्यांच्याशी बोललो होतो. मला माझ्या देशाची सेवा करण्याची संधी मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी वेळ देऊ शकलो तरच मी ती स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते. मला हा चांगला सल्ला वाटला. त्यामुळे ही माझी नवीन खेळी सुरु केली, ती किती काळ टिकेल हे मला माहीत नाही, फक्त मी ते चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतोय.”
हेही वाचा – Shardul Thakur Marriage: स्वत:च्या हळदी समारंभात शार्दुल ठाकूरचा झिंगाट डान्स; पाहा VIDEO
संसदेतील खेळी शिकण्याचा अनुभव घेत आहे –
क्रिकेटमधून राजकारणात आल्यानंतर हरभजन म्हणाला की संसदेतील खेळी शिकण्याचा अनुभव घेत आहे. हरभजन म्हणाला, “हे माझ्यासाठी पूर्णपणे वेगळे क्षेत्र आहे. मी क्रिकेटमध्ये जवळपास 20 वर्षे घालवली आहेत आणि त्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला आहे. आज मी जो काही आहे तो खेळामुळे. मी क्रिकेटपटू हरभजन सिंग असल्यामुळे मला खासदारकीही देण्यात आली. मी अजूनही खूप नवीन आहे, राजकारणात खूप कच्चा आहे आणि गोष्टी कशा चालतात हे शिकण्याचा प्रयत्न करतो.”
भारतात जे काही चालले आहे त्याबाबत मी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो-
हरभजन म्हणाला, ”मी भारतात जे काही चालले आहे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आणि तेच मुद्दे संसदेत मांडतो. मी शक्य तितक्या या राजकीय अजेंडांवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि अलीकडेच दिल्लीत महापौर आणि इतर गोष्टी आणि भाजप आणि आप यांच्यात काय घडत आहे.” महापौरपदाच्या निवडणुकीनंतर एमसीडी हाऊसमध्ये झालेल्या संघर्षाबद्दल हरभजनला विचारले असता तो म्हणाला, “हे योग्य नव्हते.” आम आदमी पार्टीच्या शैली ओबेरॉय यांची बुधवारी दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली.
हेही वाचा – ENG vs NZ: टीम साऊथीने मोडला एमएस धोनीचा विक्रम; ‘हा’ कारनामा करत मॅथ्यू हेडन आणि फ्लिंटॉफची केली बरोबरी
हरभजन सिंग म्हणाला, “जे काही घडले ती चांगली गोष्ट नव्हती आणि कारवाई पाहणाऱ्या कोणत्याही देशातील लोकांसाठी ही चांगली गोष्ट नाही. असे करणे योग्य नाही. बरेच लोक तुम्हाला पाहत आहेत. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असोत, असे वागणे अजिबात योग्य नाही. समस्या सोडवण्यासाठी तुम्ही बसून बोलू शकता.”