भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग कायमच सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. भारताच्या सामन्यासंदर्भात, खेळाडूंसंदर्भात किंवा तत्कालीन मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करत असतो. पण हरभजन सिंग सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आहे. यावेळी हरभजन बरोबर एका चाहत्याने वाद घातला आहे. हरभजन सिंगने पाकिस्तानवर भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर एका युजरच्या पोस्टवर रिप्लाय दिला होता. यावरून हे संपूर्ण प्रकरण घडले.

हरभजन सिंगने पाकिस्तानवर भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर लिहिले होते, ‘भारताचा विजयाचा आनंद…’ यावर एका चाहत्याने हिंदी कॉमेंट्रीवर निशाणा साधला होता. हरभजन सिंग अनेक क्रिकेट सामन्यांचे समालोचन करताना दिसतो. भारत-पाकिस्तान सामन्यातही तो समालोचन करत होता. यानंतर हरभजनने ही पोस्ट केली होती. त्याच्या पोस्टवर या युजरने लिहिले होते की, ‘हिंदी कॉमेंट्री या सुंदर ग्रहावरील सर्वात वाईट गोष्टींपैकी एक असू शकते.’ भज्जीने यावर रिप्लाय दिला आणि गोष्टी अधिक टोकाला पोहोचल्या.

या यूजरला उत्तर देताना हरभजनने लिहिले होते, ‘वाह, इंग्रजांची औलाद. तुझी मला किव येते. आपली भाषा बोलण्याचा आणि ऐकण्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.’ यानंतर रँडम सेना नावाच्या अकाऊंटवरून ” हे हिंदीत का नाही लिहिलं?’ बरं, अभिमान नाही गर्व असला पाहिजे.” यावर हरभजन म्हणाला, तू वेडा तर नाही वाटत पण तुझं डोकं ठिकाणावर नाही आहे. हे बरोबर लिहलंय का?

या पोस्टला उत्तर देताना या यूजरने लिहिले की, हे आहे शुद्ध हिंदी, आता तू इतरांना बोलू शकतोस. त्या युजरने हिंदीत ‘ये हुए शुद्ध हिंदी असं लिहिलं होतं. यावर हरभजन त्याला उत्तर देत म्हणाला, ‘ये हुए नाही हुई असत. मी तुझ्या उपचारासाठी आणि तू लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतो.

पण या युजरने इंझमाम उल हकचा व्हिडिओ शेअर केल्याने हा वाद आणखी चिघळला. ज्यामध्ये इंझमाम सांगत होता की, खेळताना आम्ही एक खोली बनवली होती, ज्यामध्ये आम्ही नमाज अदा करायचो. १-२ दिवसांनी भारतातून मुस्लिम क्रिकेटपटूही तिथे येऊ लागले आणि काही भारतीय खेळाडूही. मौलाना नमाजनंतर आमच्याशी बोलायचे. एके दिवशी हरभजनने मला सांगितले की मला वाटते की मी त्यांचं म्हणणं ऐकू. यावर मी म्हणालो तू करू शकतोस आणि मग हरभजन म्हणाला, मी तुला पाहून थांबतो.

या व्हीडिओच्या पोस्टला उत्तर देताना हरभजन सिंग म्हणाला, ‘हो यांनाही मानसिक उपचारासाठी तुमच्यासोबत रुग्णालयात घेऊन जा. तुमच्याप्रमाणेच त्यांनाही इलाज करण्याची गरज आहे.’ यानंतर भज्जीने या यूजरची एक जुनी पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्याने अयोध्येतील हिंदूंवर वादग्रस्त कमेंट केली होती. भज्जीने लिहिले, ‘तू नक्की कोणत्या बाजूचा आहेस? आमच्या अयोध्येतील हिंदू बांधवांना कोण चुकीचे बोलत आहे. तुझ्या मानसिक स्थितीपेक्षा तू देशद्रोही असण्याचा मला जास्त संशय आहे.

भज्जीने या यूजरच्या दुसऱ्या पोस्टला उत्तर देताना लिहिले की, ‘तू घुसखोर आहेस, हे तुझ्या घाणेरड्या भाषेवरून सिद्ध होते. कारण आपण इथे असं बोलत नाही. बाकी ज्या शिव्या तू मला दिल्या आहेस त्या मी रेकॉर्ड केल्या आहेत आणि एफआयआर दाखल केला आहे.

Story img Loader