आयपीएलच्या लिलावात भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याच्यावर एकाही संघमालकानं बोली लावली नाही. ४० वर्षीय हरजभन सिंग याची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती. गतवर्षी हरभजन सिंग यानं वयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यानंतर चेन्नईनं भज्जीला करारमुक्त केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१३ वर्षांपासून आयपीएल खेळणाऱ्या हरभजन सिंग यानं मुंबई आणि चेन्नई अशा दोन संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. भज्जी संघात असताना दोन्ही संघानं चार वेळा आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं आहे. भज्जी आपल्या आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा आयपीएलच्या लिलावात उतरला होता. हरभजन सिंग यानं २००८ पासून २०१७ पर्यंत मुंबईच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. मागील तीन वर्षांपासून भज्जी धोनीच्या चेन्नईच्या संघात होता. त्यावेळी सीएसकेनं दोन कोटी रुपयामध्ये त्याला खरेदी केलं होतं. हरभजन सिंगने २०१९ मध्ये सीएसकेकडून खेळताना ११ सामन्यात १६ बळी घेतले होते. २०२० मध्ये दुबईत झालेल्या आयपीएलमध्ये वयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती.

४० वर्षीय हरभजन सिंगनं ट्विट करत सीएसकेसोबतचा प्रवास संपुष्टात आल्याचं सांगितलं होतं. ट्विटमध्ये भज्जी म्हणाला होता की, ‘‘सीएसके सोबतचा माझा करार संपुष्टात आला आहे. या संघासोबत खेळण्याचा मिळालेला शानदार अनुभव आणि मित्र, कायमच आठवणीत राहतील. चेन्नई, संघ व्यवस्थापन, कर्मचारी आणि चाहत्यांसोबत दोन वर्ष आनंदात गेले. ऑल द बेस्ट!’’


अनुभवी हरभजन सिंग यानं १६० आयपीएल सामन्यात १५० बळी घेण्याची किमया साधली आहे. १८ धावा देत ५ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh goes unsold nck
Show comments