Manipur Women’s Violence Update: भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने मणिपूरच्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा देण्याची मागणी त्याने केली आहे. नुकताच मणिपूरमधून एक व्हिडीओ समोर आला होता; ज्यामध्ये काही लोक दोन महिलांना विवस्त्रावस्थेत घेऊन जाताना दिसत होते. मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यसभा खासदार हरभजन सिंगने महिलांना विवस्त्र करून धिंड काढलेल्या व्हायरल व्हिडीओबाबत ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे. या ट्विटद्वारे त्यानी सांगितले की, या घटनेसाठी राग हा अतिशय छोटा शब्द आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “मी रागावलो, असे म्हणत असेल तर ते अधोरेखित आहे. मी रागाने सुन्न झालो आहे. आज मणिपूरमध्ये जे काही घडले, त्याची मला लाज वाटते.”

pakistan hit & run case accused natasha danish
Video: पाकिस्तानमध्ये हिट अँड रन; बड्या उद्योगपतीच्या मुलीला पीडित कुटुंबानं केलं माफ, कायद्याच्या कचाट्यातून सुटका!
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
women raped in indore
Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
girl molested in nandurbar
Nandurbar Crime : नंदुरबारमध्ये शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून पाचवीतील मुलीचा विनयभंग; अश्लिल व्हिडीओ दाखवून…
Surykumar Yadav react on insta story about Kolkata Doctor Rape and Murder Case
Surykumar Yadav : कोलकाता बलात्कार प्रकरणावर सूर्याची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मुलींच्या रक्षणाची नव्हे तर मुलांना सज्ञान करण्याची गरज…’
Supreme Court warns state government regarding Ladaki Bahine Yojana print politics news
मोठी बातमी! कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

पुढे लिहिताना हरभजन सिंगने या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्याने लिहिले, “जर या भयंकर गुन्ह्यातील गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत आणून फाशी दिली नाही, तर आपण स्वतःला माणूस म्हणणे बंद केले पाहिजे. हे जे घडले आहे, ते मला अस्वस्थ करते. आता खूप झाले. सरकारने कारवाई केलीच पाहिजे.”

हेही वाचा – IND vs WI: ‘ते एक दिग्गज आहेत आणि त्यांच्यासह फलंदाजी करणे…’, विराट कोहलीबद्दल यशस्वी जैस्वालची प्रतिक्रिया

या घटनेनंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मणिपूर पोलिसांनी सांगितले की, थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध अपहरण, हत्या आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मणिपूर हे ईशान्य भारतातले अतिशय सुपीक, हिरवेगार आणि तीन दशलक्ष लोकसंख्या असलेले एक सुंदर राज्य. मात्र, दोन महिन्यांपासून या राज्यात अभूतपूर्व असा हिंसाचार पेटला आहे. मैतेई व कुकी या दोन समुदायांमध्ये दीर्घ काळ चाललेल्या संघर्षाने टोक गाठले आहे. मणिपूर गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे.