Harbhajan Singh picks young Indian player’s squad for T20I series: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही. येत्या काही दिवसांत बीसीसीआयकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० संघाची घोषणा केली जाणार आहे, मात्र त्याआधीच अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडकर्ते तरुण संघ निवडू शकतात आणि वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची विनंती निवड समितीकडे केली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर युवा संघ पाठवावा – हरभजन

हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, वरिष्ठ खेळाडूंनी भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि आता त्यांना विश्रांती दिली पाहिजे. मी बोर्डाला विनंती करतो की त्यांनी उशीर न करता युवा संघ वेस्ट इंडिजला पाठवावा. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी द्यायला हवी, असे हरभजन सिंगने म्हटले आहे. हरभजनने यशस्वी जैस्वाल आणि आकाश मधवाल यांच्या नावाची शिफारस केली आहे.

Pakistan Creates Unwanted Record Becomes 2nd Team to Lose 20 Consecutive Test Matches At Home
PAK vs BAN: पाकिस्तानच्या नावे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील लाजिरवाणा रेकॉर्ड, घरच्या मैदानावरचं केला नकोसा विक्रम
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
WTC 2025 Final Dates Announced by ICC 11 to 15 June Lords Cricket Ground
WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल
Joe root make most test runs at lords cricket ground
Joe root : जो रूटने क्रिकेटच्या पंढरीत केला मोठा पराक्रम! सर्व फलंदाजांना मागे टाकत लॉर्ड्सवर केली खास कामगिरी
Deandra Dottin Javelin Gold Medalist Won Cricket Match in Super Over Caribbean Premiere League
VIDEO: सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटूने सुपर ओव्हरमध्ये संघाला जिंकून दिला सामना, भारताच्या जेमिमा रॉड्रीग्जने दिली साथ
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
Joe Root most test fifty record
ENG vs SL : जो रूटने एकाच डावात मोडले दोन मोठे रेकॉर्ड, राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला टाकले मागे
ENG vs SL 1st Test Who is Harry Singh Son of India Former Player RP Singh Senior in England Test Team
ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?

हार्दिक पांड्या हा भज्जीच्या संघाचा कर्णधार आहे –

वेस्ट इंडिज दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी हरभजन सिंगने आपला संघ जाहीर केला आहे. हार्दिक पांड्या हा हरभजनच्या टी-२० संघाचा कर्णधार आहे. त्याचबरोबर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांची सलामीवीर म्हणून नावे आहेत. हरभजनच्या या संघात ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि आकाश मधवाल यांचीही नावे आहेत. हे असे खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएल २०२३ मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.

भज्जीच्या संघातील अष्टपैलू आणि फिरकीपटूंपैकी कोण?

या संघाची घोषणा करताना हरभजनने म्हटले आहे की, “मी अक्षर पटेलला अष्टपैलू म्हणून या संघात घेईन, कारण रवींद्र जडेजाला विश्रांती मिळायला हवी. याशिवाय रवी बिश्नोई आणि युजवेंद्र चहल हे फिरकीपटू म्हणून माझ्या संघात आहेत. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलताना, मला वाटते की आकाश मधवाल देखील संघात असावा कारण तो आयपीएल २०२३ मध्ये उत्कृष्ट खेळाडू राहिला. गिल आणि जयस्वाल नक्कीच सलामीवीरांची भूमिका पार पाडतील.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी हरभजन सिंगचा टी-२० संघ –

शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि आकाश मधवाल.