Harbhajan Singh reacts to Rohit Sharma’s advice: आयसीसी डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या हंगामातील अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून २०९ धावांनी पराभव पत्करावा लागला. ही गदा जिंकून सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अजूनही अपूर्ण राहिले. अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आयसीसीला एक सल्ला दिला होता. मात्र त्याच्या सल्ल्यावर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने असहमती व्यक्त केली आहे.

या सामन्यातील पराभवानंतर पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “डब्ल्यूटीसी विजेता ठरवण्यासाठी एका सामन्याऐवजी तीन सामन्यांची मालिका करण्याचा निर्णय घेतला, तर खूप चांगले होईल. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर तुम्ही अंतिम फेरीत पोहोचता. पण ३ सामन्यांच्या मालिकेसाठी, त्यानुसार विंडो देखील पहावी लागेल.”

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Ranji Trophy 2025 Rohit Sharma suffers twin failure on Ranji return gets out for 28 in 2nd innings Mum vs JK match
Ranji Trophy 2025 : रोहित शर्मा रणजी ट्रॉफीच्या सलग दुसऱ्या डावात अपयशी, हिटमॅनचा झेलबाद झाल्याचा VIDEO व्हायरल

मला फक्त ५० षटकांच्या विश्वचषकात काय झाले हे विचारायचे आहे –

रोहितच्या या वक्तव्यावर हरभजन सिंग एका स्पोर्ट्स वेबसाइटवर बोलताना म्हणाला की, “मला फक्त ५० षटकांच्या विश्वचषकात काय झाले हे विचारायचे आहे. तुम्हाला तिथेही तीन फायनल हवे आहेत का. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात झाले तर तुम्ही काय उत्तर द्याल? त्यावेळी तुम्ही म्हणाल नाही, फक्त एक फायनल मॅच पुरेशी आहे. या कारणास्तव, जेव्हा ५० षटकांच्या विश्वचषकात एक फायनल असते, तेव्हा कसोटी चॅम्पियनशिपमध्येही एक फायनल आहे. टेनिस, फुटबॉलसारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही एकच अंतिम सामना असतो.”

हेही वाचा – IND vs AUS: “भारतीय फलंदाजांनी बाबर-विल्यम्सनकडून शिकावे कसे…”; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान

ऑलिम्पिकमध्ये खेळाडू अंतिम फेरीत केवळ एकाच संधीत पदक जिंकतात –

रोहित शर्माच्या या उत्तरावर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला प्रश्न विचारला असता, तो म्हणाला की आम्ही आमच्या नावावर डब्ल्यूटीसीची गदा केली आहे. तीन सामन्यांची मालिका असो किंवा १६ सामन्यांची मालिका, याबाबत आम्हाला कोणतीही अडचण नाही. पण ऑलिम्पिकमध्ये खेळाडू अंतिम फेरीत केवळ एकाच संधीत पदक जिंकतात.

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला.

Story img Loader