IND vs AUS, CWC 2023 Final : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी एकदिवशीय विश्वषचक स्पर्धेतील अंतिम सामना होत आहे. या सामन्याला भारतीय खेळाडूंच्या पत्नीही उपस्थित आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग यानं अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीबद्दल केलेल्या विधानानं वादाला तोंड फुटलं आहे.

सामन्यात अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी स्टेडियममध्ये गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी लाईव्ह कॉमेंट्री करताना हरभजन सिंगने अनुष्का आणि अथियाला क्रिकेटची किती समज आहे? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हरभजन सिंग म्हणाला, “मी हा विचार करतोय, यांच्यात क्रिकेट की चित्रपटाबद्दल गप्पा रंगल्या आहेत? कारण, त्यांना क्रिकेटबद्दल किती समजते, हे मला माहिती नाही.”

हेही वाचा : कोणी मॉडेल, कोणी आमदार तर कोणी गृहिणी; भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी काय करतात?

या विधानानंतर हरभजन सिंगविरोधात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कारण, अनुष्का शर्मा स्टार खेळाडू विराट कोहलीची पत्नी आहे. तर, अथिया शेट्टी उपकर्णधार के. एल राहुलची पत्नी आहे.

हेही वाचा : फायनलचा थरार बघायला आलेल्या अनुष्का शर्माच्या ड्रेसची पुन्हा चर्चा; पाहा वर्ल्ड कप लूकची किंमत काय?

एक युजरने ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर लिहिलं, “हरजभन सिंग, मोहम्मद कैफ आणि पद्मजीत सेहरावत हे विश्वषचकात सर्वात वाईट कॉमेंट्री देणारे समालोचन आहेत. नेहमी बेजबाबदार कर्णधाराची बाजू घेणारा कोहलीला ट्रोल करत असतो. आता, हरभजन सिंगने अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीलाही लक्ष्य केलं आहे. ही लाजीरवाणी बाब आहे.”

शुभम गुप्ता हा युजर म्हणाला, “मला माहिती नाही, यांना क्रिकेट किती समजते?”

“महिलांना क्रिकेट कळत नाही असं तुम्हाला म्हणायचं का? तातडीनं माफी मागवी,” अशी मागणी अरूणोदय सिंग याने केली आहे.

Story img Loader