आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ३० सदस्यीय संभाव्य भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. अनुभवी सलामीवीर गौतम गंभीरला या संघातून वगळण्यात आले आहे मात्र त्याचवेळी हरभजनला संघात स्थान देण्यात आले आहे. दिल्लीचा अनुभवी ३४ वर्षीय अष्टपैलू खेळाडू रजत भाटियाला समाविष्ट करत निवड समितीने सर्वाना चकित केले आहे. इरफान आणि युसुफ पठाण बंधू, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांचा या यादीत समावेश नाही.  दिल्लीच्याच ३४ वर्षीय भाटियाला निवडत निवडसमितीने आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाटियाने ८७ प्रथम श्रेणीच्या सामन्यांमध्ये ५०८९ धावा केल्या असून, १०७ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्त्व करताना उपयुक्त कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आल्याचे या यादीद्वारे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा