Harbhajan Singh says Cheteshwar Pujara was not dropped but may have been rested: वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळल्या जाणा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी टीम इंडियाचा संघ जाहीर केला. या संघातून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता माजी खेळाडूला वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये आता माजी खेळाडू हरभजन सिंगही सामील झाला आहे. हरभजन सिंगच्या मते पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले नसून त्याला विश्रांती देण्यात आली असावी.

पुजाराला वगळण्याऐवजी विश्रांती दिली असावी –

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील खराब कामगिरीनंतर चेतेश्वर पुजारावर सातत्याने टीका होत आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात चेतेश्वर पुजाराचे नाव नसल्याने हरभजन सिंगने प्रतिक्रिया दिली. हरभजन सिंग आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणालाकी, “मला आशा आहे की त्याला वगळण्याऐवजी विश्रांती देण्यात आली असावी. तुमच्यासाठी १०० हून अधिक कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूला तुमच्याकडून आदराची अपेक्षा असते. मला आशा आहे की निवडकर्त्यांनी त्याच्याशी याबद्दल चर्चा केली असेल.”

gauraksha worker beaten up kalyan marathi news
कल्याणमध्ये अ. भा. गौ रक्षा महासंघाच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून तबेल्यात बेदम मारहाण, जिवंत गाडून टाकण्याची आरोपींची धमकी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Paralympic gold medal Praveen Kumar Paralympics sport news
हार न मानण्याची प्रवृत्ती हीच प्रवीणची ताकद
Gautam Gambhir All Time India XI
Gautam Gambhir : गौतम गंभीरने निवडली भारताची ऑल टाईम इलेव्हन, रोहितसह ‘या’ दिग्गजांना दिला डच्चू, पाहा कोणत्या खेळाडूंना मिळाले स्थान?
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
kalyaninagar car accident accussed surendra agarwal for abusing and threatening to kill employee
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी गेल्या दोन वर्षात काही विशेष नाही –

हरभजन सिंगने पुढे म्हणाला की, “चेतेश्वर पुजारा व्यतिरिक्त भारतीय संघातील इतर काही वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी गेल्या दोन वर्षात काही विशेष दिसली नाही. अशा परिस्थितीत पुजारासारख्या खेळाडूंबाबत निवडकर्ते असा निर्णय घेताना दिसतील का? खेळाडू कितीही मोठा असला तरी सर्व खेळाडूंसाठी असे निर्णय सारखेच असले पाहिजेत. जर तुम्ही पुजाराला महान खेळाडू मानत नसाल तर माझ्यासाठी इतर खेळाडूही महान नाहीत.”

हेही वाचा – Mukesh Kumar: टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची टीम इंडियात निवड! प्लेइंग इलेव्हनध्ये मिळणार का संधी?

बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यापैकी एक यशस्वी जैस्वाल आहे, तर दुसरा ऋतुराज गायकवाड आहे. टीम इंडियाला १२ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी