आपल्या देशात क्रिकेटला अगदी धर्माचा दर्जा दिला जातो. आपल्याकडे प्रत्येक वयोगटामध्ये क्रिकेटवेडे चाहते दिसतात. प्रत्येक खेड्यामध्ये आणि शहरामध्ये लाखो मुलं क्रिकेट खेळतात. या मुलांमधूनच भारतीय क्रिकेटला अनेक प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगदेखील अशाच एका प्रतिभावान खेळाडूचा चाहता झाला आहे. विशेष म्हणजे हरभजन ज्या खेळाडूचा चाहता आहे, तो खेळाडू इतरांपेक्षा काहीसा वेगळा आहे. हरभजनने ट्वीट करून या खेळाडूचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडिया’ने एक व्हिडीओ ट्वीट केलेला आहे. त्या व्हिडीओमध्ये जी शिवशंकरा नावाचा दिव्यांग खेळाडू नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. या व्हिडीओने भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगला प्रभावित केले आहे. त्याने शिवशंकराचा व्हिडीओ रिट्वीट करून “आदर”, असे लिहिले आहे.

डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘शिवशंकराचे कौशल्य आणि श्रेणी कोणत्याही सामान्य खेळाडूपेक्षा कमी नाही. त्याला फक्त योग्य संधी आणि व्यासपीठाची गरज आहे. असे कौशल्य असणारा तो एकटाच नाही. त्याच्यासारखे अनेक खेळाडू आहेत ज्यांना फक्त व्यासपीठ हवे आहे. डीसीसीआयमध्ये असे अनेक प्रतिभावान दिव्यांग खेळाडू आहेत. त्यांच्या भविष्यासाठी कठोर परिश्रम घेतले जात आहेत.’

हेही वाचा – “बरं झालं त्याला दोन वर्ष संघाबाहेर ठेवलं”, हार्दिक पंड्याबाबत पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

हरभजन सिंगने नुकतीच राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये तो लिजेंड्स लीग क्रिकेटच्या (एलएलसी) दुसऱ्या सत्रात क्रिकेट खेळताना दिसणार आहे. या लीगमध्ये हरभजनसोबत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युसूफ पठाण, माजी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली, फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन आणि विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन हेही सामील होणार आहेत.