Harbhajan Singh on Andrew Symonds Death: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेपटू ॲन्ड्र्यू सायमंड्सचं रविवारी रात्री अपघाती निधन झालं. ४६ वर्षीय सायमंड्सचा ऑस्ट्रेलियामध्ये कार अपघातात निधन झालं. क्विन्सलॅण्डमधील अॅलिक रिव्हर ब्रीज येथील हार्वे रेंज रोडवर सायमंडचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. सायमंडच्या अकाली निधनामुळे क्रिकेट विश्वासा मोठा धक्का बसला आहे. अनेक मान्यवरांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केलेली असतानाच मंकीगेट प्रकरणामुळे सायमंड्स विरुद्ध हरभजन सिंग असा वाद निर्माण झाल्याची आठवण अनेकांना सायमंड्सच्या मृत्यूच्या बातमीनंतर झालीय. दरम्यान या प्रकरणामध्ये सायमंड्सविरोधात असणाऱ्या भारताच्या माजी फिरकीपटूने म्हणजेच हरभजननेही सायमंड्सच्या मृत्यूसंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्यात.
नक्की वाचा >> विश्लेषण : अँड्र्यू सायमंड्स… गुणवान, रांगडा आणि वादग्रस्त!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा