Harbhajan Singh slams Pakistan journalist for bizarre Dhoni-Rizwan comparison : भारत आणि पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेटपटूंचा सामना असो वा नसो, सोशल मीडियावर त्यांची क्रेझ नेहमीच असते. दोन्ही संघातील खेळाडूंची बरीच चर्चा होत असते. चाहतेही या दोन्ही संघांतील खेळाडूंची सातत्याने तुलना करत राहतात. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर यांच्यातील स्पर्धेची चर्चा केली जात होती. त्यानंतर काही काळ बाबर आझम आणि विराट कोहलीची तलना झाली आहे. आता एका पाकिस्तानी पाकिस्तानी पत्रकाराने रिझवानची धोनीशी तुलना केल्यामुळे हरभजन सिंग चांगलाच संतापला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानी पत्रकार फरीद खानने सोशल मीडियावर दोन यष्टीरक्षकांची तुलना केली आहे. त्याने जगातील महान यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीची तुलना मोहम्मद रिझवानशी केली. धोनी आणि रिजवान यांच्यात तुलना होऊ शकत नाही, परंतु सोशल मीडियावर लाइक्स आणि व्ह्यूज मिळविण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने हे केले. हे पाहून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग संतापला. ज्यामुळे त्याने ही पोस्ट रिट्विट पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले आहे.

पाकिस्तानी पत्रकाराकडून रिझवानची धोनीशी तुलना –

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पाकिस्तानी पत्रकार फरीद खानने लिहिले की, “एमएस धोनी की मोहम्मद रिझवान? कोण सरस आहे? खरं सांगा.” ही पोस्ट पाहून भारतीय क्रिकेट संघाचे चाहते संतापले. त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये तीव्र संताप व्यक्त केला. त्याचबरोबर माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने ही पोस्ट रिट्विट करत चांगलाच खरपूस समाचार घेतला.

हरभजन सिंगने पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले –

हरभजन सिंगने ही पोस्ट रिट्विट करत लिहिले, “तुम्ही आजकाल काय धूम्रपान करत आहात? ज्यामुळे असे मूर्खासारखे प्रश्न विचारता. भावांनो, त्याला कोणी तर सांगा की धोनी रिझवानपेक्षा खूप पुढे आहे. मला रिझवान आवडतो, तो एक चांगला खेळाडू आहे जो नेहमी इराद्याने खेळतो, पण ही तुलना चुकीची आहे. धोनी अजूनही जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यष्टीमागे त्याच्यापेक्षा सरस कोणी नाही.”

हेही वाचा – Deepak Hooda : भारतीय क्रिकेटपटूने गर्लफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, नऊ वर्षांपासून एकमेकांना करत होते डेट

एमएस धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

एमएस धोनीने २००४ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि २०१९ मध्ये शेवटचा सामना खेळला. या काळात त्याने ९० कसोटी सामन्यांमध्ये ४८७६ धावा केल्या. माहीने वनडेमध्ये ३५० सामने खेळले. ज्यामध्ये ५०.५८ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या. त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतके झळकावली. टी-२० क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर माजी कर्णधाराने ९८ सामन्यात १६१७ धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने २६४ सामन्यांमध्ये ५२४३ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh slams pakistan journalist farid khan for bizarre ms dhoni mohammad rizwan comparison vbm