Harbhajan Singh Gets Angry in Pakistan Live Show Video: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. २०१७ नंतर ८ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळbली जाणार आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असल्याने सर्व संघांना पाकिस्तानमध्ये जावं लागणार आहे. पण या आठवड्याच्या सुरुवातीलाच आलेल्या ANI च्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) स्पर्धेसाठी हायब्रिड मॉडेलद्वारे भारताचे सामने आयोजित केले जावेत असा प्रस्ताव मांडणार आहे. यादरम्यानचं भारताचा माजी क्रिकेटपटू हरभडन सिंग एका पाकिस्तानी शोमध्ये बोलत असताना चांगलाच भडकला. त्याचं वक्तव्य सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Hardik Pandya: अंबानींच्या लग्नात हार्दिक पंड्या २ तकिला मागतानाचा VIDEO व्हायरल
पाकिस्तानी लाइव्ह शोमध्ये हरभजन सिंग भडकला
एका पाकिस्तानी वाहिनीवरील लाईव्ह शोमध्ये हरभजन सिंग म्हणाला, “जर आमचे खेळाडू पाकिस्तानात सुरक्षित नसतील तर आम्ही आमचा संघ पाठवणार नाही. तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा आणि नसेल खेळायचं तर नका खेळू. भारतीय क्रिकेट पाकिस्तानशिवाय जगू शकतो. जर तुम्ही लोक भारतीय क्रिकेटशिवाय जगू शकत असाल तर तसं करा.”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत खेळू शकते बीसीसीआय याबाबत आयसीसीशी चर्चा करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, बीसीसीआयने अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. तत्पूर्वी पाकिस्तानने भारताच्या सर्व सामन्यांसाठी लाहोर हे ठिकाण निवडले असून वेळापत्रकाचा मसुदा पाकिस्तानने आयसीसीकडे सोपवला आहे.
हेही वाचा – James Anderson: कोणासमोर गोलंदाजी करणं अवघड? ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेत अँडरसन म्हणाला…
चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान सुरू होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रकही लवकरच येणार आहे. पीसीबीने या स्पर्धेसाठी आपला मसुदा आधीच सादर केला आहे, ज्यामध्ये लाहोरमध्ये ७ सामने, रावळपिंडीमध्ये ५ आणि कराचीमध्ये ३ सामने होणार होते. पीसीबीने आपल्या वेळापत्रकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १ मार्च रोजी लाहोरमध्ये होणारा सामना निश्चित केला आहे.
पाकिस्तानने गेल्या वर्षी आशिया चषकाचे आयोजन केले होते, परंतु भारताने आपले सर्व सामने ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत श्रीलंकेत खेळले होते. आठ देशांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तानमधली ही पहिलीच मोठी क्रिकेट स्पर्धा असेल, याआधी १९९६ साली पाकिस्तानने भारत आणि श्रीलंकेसोबत विश्वचषकाचे आयोजन केले होते.