गौतम गंभीरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंडिया महाराजा संघाला लीजेंड्स क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सामन्यात वर्ल्ड जायंट्सने २ धावांनी पराभूत केलं. इंडिया महराजाचा संघाला या टुर्नामेंटमध्ये सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. याआधी शाहिद आफ्रिदीच्या एशिया लायंसने महाराजा संघाचा पराभव केला होता. भारतीय गोलंदाजांना वर्ल्ड जायंट्सच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात कमालच केली. खासकरून हरभजन सिंगने त्याच्या फिरकीच्या जादूने जगातील दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. वर्ल्ड जायंट्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ विकेट्स गमावून १६६ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंडिया महाराजा संघाने २० षटकात ५ विकेट्स गमावून १६४ धावा केल्या.
ब्रेट लीने सामन्याचं रुपडं पालटलं
शेवटच्या षटकात गंभीरच्या संघाला ८ धावा करायच्या होत्या. पण ब्रेट लीने घातक गोलंदाजी करत त्याच्या वर्ल्ड जायंट्स संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात ब्रेट लीने फक्त ५ धावा दिल्या आणि वर्ल्ड जायंट्सला विजय मिळवून दिला.
इथे पाहा व्हिडीओ
गंभीर आणि हरभजनने केली कमाल
गंभीरने सामन्यात पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत अर्धशतक ठोकलं. त्याने ४२ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. पण गंभीरला त्याच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. तर हरभजन सिंगने भेदक गोलंदाजी करून पुन्हा एकदा जुन्या फिरकीची जादू मैदानात दाखवली. हरभजनने २ षटकात १३ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
ख्रिस गेलला दिला चकवा
वर्ल्ड जायंट्सचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला हरभजनने त्याच्या जादुई फिरकीनं चकवा देऊन क्लीन बोल्ड केलं. गेल ज्या अंदाजात बोल्ड झाला, ते पाहून मैदानात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लेग स्टंम्पवर फेकलेल्या चेंडून गेलला चकवा दिला आणि चेंडू थेट स्टंम्पवर जाऊन लागला. ख्रिस गेलने फक्त ६ धावाच केल्या. चेंडू लेग संम्पच्या दिशेन गेला आणि अचानक टर्न झाला. त्यामुळे गेलला चेंडूचा अचूक अंदाज घेता आला नाही आणि गेल त्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.