Harbhajan Singh Picks Spinning Pair For Asia Cup 2023: पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक 2023 साठी टीम इंडियाचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही, अशा परिस्थितीत कोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार याबाबत चर्चेचा सुरु आहेत. श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. यासाठी संघाकडे अनेक पर्याय आहेत, ज्यातून एक जोडी निवडावी लागेल. अशा परिस्थितीत माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगने आपली आवडती जोडी निवडली आहे.

आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. गेल्या वेळी ही स्पर्धा श्रीलंकेत झाली होती, त्यात भारताने बाजी मारली होती. अशा परिस्थितीत भारताला ही लय कायम ठेवायला आवडेल. या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन वर्ल्ड कपमध्येही असू शकते.

Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य

हरभजन सिंगने युजवेंद्र चहलवर व्यक्त केला विश्वास –

रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल हे आगामी २०२३ आशिया चषक स्पर्धेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये निश्चित आहेत आणि हे दोन खेळाडू भारताच्या फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळतील, असे माजी भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगला वाटते. मेन इन ब्लू संघ विक्रमी आठव्या विजेतेपदासाठी महाद्वीपीय स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्यांना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि गतविजेता श्रीलंका यांच्या कठोर आव्हानाला सामोरे जावे लागेल. जर परिस्थिती अनुकूल असेल, तर भारत कुलदीप यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्याचा विचार करू शकतो, असेही हरभजन म्हणाला. मात्र, त्याच्या मते कुलदीपच्या आधी संघात चहलची निवड होईल.

हेही वाचा – Ghoomar Movie: वीरेंद्र सेहवागच्या तोंडून मुलाची स्तुती ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मानले आभार, शेअर केला VIDEO

हरभजन सिंगने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, “श्रीलंकेतील विकेट्स फलंदाजीसाठी अनुकूल आहेत आणि फिरकीपटूंनाही मदत करते. त्यामुळे मला वाटते की जडेजा आणि चहल निश्चितपणे प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील, परंतु जर परिस्थिती खरोखरच फिरकीसाठी चांगली असेल, तर दोन आघाडीचे फिरकीपटू खेळवले जाऊ शकतात. यामध्ये कुलदीप यादवचाही समावेश केला जाऊ शकतो.”

हेही वाचा – IND vs PAK: ‘…म्हणून २०२१ मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव झाला’; शोएब अख्तरने केला खुलासा

कुलदीप-जडेजा जोडीने वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती कमाल –

भारताने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळली आहे. या मालिकेत टीम इंडियाने चहलला मागे ठेवत कुलदीप आणि जडेजा या जोडीला संधी दिली होती. तसेच या दोघांची जोडी यशस्वी ठरली आणि कुलदीप सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून उदयास आला.
जर आपण दोघांच्या कामगिरीवर नजर टाकली, तर कुलदीपने जास्त सामने खेळले असले तरी विकेट्सच्या बाबतीत तो पुढे आहे. चहलने या फॉरमॅटमध्ये ७२ मॅचमध्ये १२१ विकेट घेतल्या आहेत, तर कुलदीपने ८४ मॅचमध्ये १४१ विकेट घेतल्या आहेत.

Story img Loader