Harbhajan Yuvraj and Raina Viral Dance Step on Tauba Tauba Song: भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनी अभिनेता विक्की कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यातील व्हायरल स्टेपवर एक भन्नाट रिल शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ‘तौबा-तौबा’ गाणं खूप व्हायरल झालं असून त्या गाण्याची स्टेप करताना सर्वच जण दिसत आहेत. अनेकजण विकी कौशलच्या या स्टेपची कॉपी करत आहेत, तर कुणी रील बनवत आहेत. आता माजी भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ‘तौबा-तौबा’ गाण्यावर फनी डान्स करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना दरवाज्यातून आत येताना ही स्टेप करताना दिसत आहेत. तिघेही विक्की कौशलच्या स्टेप्सची अतिशय मजेदार पद्धतीने कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. प्रथम युवराज आला, जो आपले लंगडत चालत होता. तर हरभजन सिंग पाठीमागून येतो पण काही अंतरावर येताच तो उजव्या पायाने लंगडायला लागतो. दरम्यान, सुरेश रैना गाणं बोलत डान्स करत पुढे येतो पण विकी कौशलच्या डान्स स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न करत असताना तोही लंगडत पुढे येतो. या तिघांसह गुरकिरत सिंग हा खेळाडूही त्यांच्यासोबत होता, गुरकिरतने ही स्टेप दोन वेळा केली.

हेही वाचा – Champions Trophy 2025: ‘भारतीय संघ पाकिस्तानात नाही आला तर…’, PCB ने BCCIला दिली धमकी?

हरभजन सिंगने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “१५ दिवस लेजंड्सच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळताना आमच्या शरीरही गाण्याप्रमाणे तौबा-तौबा झालंय. शरीराचा प्रत्येक अवयव दुखत आहे. आम्ही विकी कौशल आणि करण औजला यांना थेट टक्कर देत आहोत.” या मजेदार व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना स्वत: विकी कौशलने हसणारे इमोजी शेअर केला आहे.

युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांच्यासह भारतीय संघातील काही माजी क्रिकेटपटूंनी नुकतीच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, गट सामन्यांमध्ये टीम इंडियाला ५ पैकी फक्त २ सामने जिंकता आले पण संघाने सेमीफायनल गाठली. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ८६ धावांनी पराभव केला आणि त्यानंतर विजेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून ट्रॉफी जिंकली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh yuvraj singh suresh raina hilarious dance step at vicky kaushal tauba tauba song video viral bdg