Harbhajan Singh’s Statement on Team India Unity: भारतीय क्रिकेट संघ रविवारी २०२३ च्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाने शेवटचा २०११ मध्ये विश्वचषक जिंकला होता, त्यामुळे वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने ते प्रवेश करणार आहेत. मेन इन ब्लू एकत्र तयारी करत असताना माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने संघाच्या एकजुटीवर मोठे विधान केले आहे.

२०२३ चा विश्वचषक विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन, मोहम्मद शमी इत्यादी सुपरस्टार्ससाठी शेवटची स्पर्धा असू शकते. २०११ चा भारतीय संघ महान सचिन तेंडुलकरसाठी विश्वचषक जिंकू इच्छित होता, असे अनेकदा म्हटले जाते. यावेळी विराट कोहलीच्या बाबतीतही असेच होईल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असा प्रश्न हरभजन सिंगला विचारला असता त्याने धक्कादायक उत्तर दिले.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Twenty20 series India vs South Africa match sport news
भारताच्या युवा ताऱ्यांचा कस; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना आज
maharashtra assembly election 2024, mahayuti
राज्यात महायुतीच्या २०० पेक्षा जास्त जागा जिंकून येणार, भाजपच्या नेत्याचा दावा
yogendra yadav BJP Traitor Party
भाजप देशद्रोही पक्ष – योगेंद्र यादव

२०११ आणि २०२३ च्या संघात मोठा फरक – हरभजन सिंग

इंडिया टुडेवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला की २०२३ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ २०११ च्या विश्वचषक संघासारखा एकसंध आहे, असे मला वाटत नाही. भज्जी म्हणाला, “दोन्ही संघांमध्ये मोठा फरक आहे. तो संघ (२०११ विश्वचषक विजेता भारतीय संघ) खूप एकजूट होता. त्यांना सचिन तेंडुलकरसाठी वर्ल्ड कप जिंकायचा होता. त्याला इतरांकडून खूप आदर मिळाला. मला या संघाबद्दल (२०२३ विश्वचषक संघ) खात्री नाही. विराट कोहलीसाठी विश्वचषक कोणाला जिंकायचा आहे, हे माहित नाही. पण, त्यांना भारतासाठी नक्कीच जिंकायचे आहे. हा मोठा फरक आहे.”

हेही वाचा – IND vs AUS: आश्विन ११ वर्षानंतर चेन्नईत वनडे खेळण्यासाठी सज्ज! आयसीसीने शेअर केला ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारा VIDEO

मला माहित नाही की कोहलीसाठी कोणाला जेतेपद मिळवून द्यायचे आहे –

हरभजनने पुढे आपला मुद्दा स्पष्ट केला आणि सांगितले की संपूर्ण संघ सचिनचा इतका आदर करतो की सर्व खेळाडूंना त्याच्यासाठी विश्वचषक जिंकायचा होता. सध्याच्या संघातील खेळाडू कोहलीबद्दल इतके एकसंध आहेत की नाही याची त्याला खात्री नाही. तो म्हणाला की, “जेवढा सन्मान सचिन तेंडुलकरला २०११ च्या संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये मिळाला, तो तेव्हापासून इतर कोणत्याही खेळाडूला मिळाला नाही. एमएस धोनीने देखील खूप आदर मिळवला, परंतु मला वाटत नाही की त्याच्यानंतर कोणत्याही खेळाडूसोबत असे घडले असेल.”