पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA), भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगच्या सल्ल्यानुसार, राज्याच्या ग्रामीण भागात चाचण्या घेतल्या. ज्यामध्ये १००० हून अधिक खेळाडूंनी ‘वेगवान गोलंदाजांचा गट’ तयार करण्यासाठी भाग घेतला. यापैकी बरेच गोलंदाज असे आहेत ज्यांनी या चाचणीपूर्वी कधीही ‘लेदर बॉल’ वापरला नव्हता. त्यांनी देखील यात सहभाग घेतला.

पीसीएने १० ते २१ जून दरम्यान राज्यातील विविध विभागांमध्ये झालेल्या चाचण्यांमधून ९३ गोलंदाजांची निवड केली आहे. राज्यसभा खासदार हरभजन पीसीएला आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा सल्ला देत आहेत. BCCI (क्रिकेट बोर्ड ऑफ इंडिया) कडून मिळणाऱ्या निधीचा पंजाब क्रिकेट बोर्डाने योग्य वापर करावा अशी त्याची इच्छा आहे.

हेही वाचा: Harbhajan Singh: “कदर करो हमारी खामोशी की…” हरभजन सिंगने सोशल मीडियावर केली एक गूढ पोस्ट शेअर

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग सध्या त्याच्या कुटुंबासोबत सुट्टी आनंद लुटत आहे. त्यादरम्यान भज्जी पुढे म्हणाला, “मला वाटत नाही की बहुतेक राज्यांनी यापूर्वी असे केले असेल. वयोगटापुरते मर्यादित न ठेवता आम्ही खुली चाचणी घेतली. पंजाब बोर्डाने वेगवान गोलंदाजीत नवीन प्रतिभा शोधावी अशी माझी इच्छा होती.”

पुढे बोलताना तो म्हणाला की, “पंजाबमध्ये मजबूत शरीरयष्टी असलेले खेळाडू आहेत. तसेच, आमच्याकडे उमरान मलिक किंवा कुलदीप सेनसारखे वेगवान गोलंदाज नाहीत यावर मी विश्वास ठेवायला तयार नाही. पंजाबमध्ये असे युवा खेळाडू सापडतील. पंजाब क्रिकेट बोर्डाचा हा विचार चांगला गोलंदाज बनण्यास मदत करेल असे मला वाटते. १६ ते २४ वयोगटातील सुमारे ९० खेळाडू आम्ही आधीच ओळखले आहेत.”

हेही वाचा: Virat Kohli: “लोअर लेले भाई…”, अंडर-१७ पासून विराटसोबत असणाऱ्या खेळाडूशी असा झाला होता पहिला संवाद

पंजाब राज्य संघात गेल्या काही वर्षांत सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, बलतेज धांडा असे मध्यमगती गोलंदाज आहेत. त्याच्या गोलंदाजीचा वेग १२५ किमी प्रतितास ते १३५ किमी प्रतितास इतका आहे. व्हीआरव्ही सिंगच्या जाण्यापासून पंजाबला असे वेगवान गोलंदाज सापडलेले नाहीत जे सातत्याने १४० ते १४५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतात. सचिव दिलशेर खन्ना यांच्या नेतृत्वाखालील ‘पीसीए’ने माजी राष्ट्रीय निवडकर्ता हरविंदर सिंग तसेच माजी भारतीय वेगवान गोलंदाज मनप्रीत सिंग गोनी आणि गगनदीप सिंग यांची अल्प व दीर्घकालीन योजनांच्या अंतर्गत प्रतिभा शोधण्यासाठी नियुक्त केली आहे.

Story img Loader