५ नोव्हेंबर २०२२ रोजी ३४ वर्षांचा झालेला विराट कोहलीचा वाढदिवस हा आज एका उत्सवासारखा वाटतो. आजचा वाढदिवस विराट कोहलीसाठी खूप विशेष आहे. कारण मागील एक-दीड वर्षात जे झाले, ते विराटच्या आयुष्यात कधीच झाले नव्हते. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात बॅडपॅच येतात, मात्र विराटच्याबाबतीत तो थोडा जास्त काळ राहिला.

गेल्या वर्षी त्याच्या खराब फॉर्ममुळे विराट कोहलीने खूप काही पाहिले. दरम्यान आयुष्य कधी असे असेल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल. त्याने केवळ खेळपट्टीवर भारताच्या अपयशाची भरपाई केली नाही, तर तो भारतीय क्रिकेटच्या सर्वोच्च सन्मानांसोबत अत्यंत सार्वजनिक, खराब व्यवस्थापित केलेल्या शब्दयुद्धातही गुंतला होता. ३३ आणि ३४ च्या दरम्यान असलेल्या टप्प्याने महान विराट कोहलीला काही शिकवले असेल तर – ते असे की काहीही शाश्वत नाही. फॉर्म विसरा, जागतिक क्रिकेटमधला तुमचा दर्जा विसरा, तुम्ही स्वेच्छेने दिलेला आदर सुद्धा डोळ्याच्या झटक्यात नाहीसा होतो.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
aditya roy kapoor
रुपेरी पडद्यावरील सच्चा प्रेमी आदित्य रॉय कपूर खऱ्या आयुष्यात पडला ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात
Lakhat Ek Aamcha Dada fame nitish Chavan wishing post for Mahesh Jadhav
Video: “काजू आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव…”, ‘लाखात एक…’ फेम नितीश चव्हाणने महेश जाधवला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
hrithik roshan share karan arjun movie memory
शाहरुख-सलमानची प्रमुख भूमिका, कौटुंबिक ड्रामा अन्…; ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार ‘हा’ चित्रपट, हृतिक रोशनशी आहे खास कनेक्शन
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर
saif ali khan amrita singh marriage story
सैफ अली खानने २१व्या वर्षी केले होते लग्न, आई-वडिलांनाही दिली नव्हती कल्पना; किस्सा सांगत म्हणालेला, “पहिलीच डेट आणि…”

या काळात विराट कोहलीला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले, रजेवर जाण्यास सांगण्यात आले. हा त्याचा वनवास आशिया चषक स्पर्धेत संपुष्टात आला. आशिया चषक स्पर्धेत त्याने अफगाणिस्तानविरुद्ध धडाकेबाज शतकी खेळी केली नसती तर कदाचित तो अजूनही खेळला असता. पण, पहिल्यासारखा तो मान सन्मान मिळाला नसता.

त्याच्या कारकिर्दीत प्रथमच – एका महिन्यासाठी क्रिकेट सोडले असताना, त्या काळात सर्व काही ठीक नव्हते, असे कोहलीने त्याच्या खेळीनंतर लगेच सूचित केले होते. कोहली त्याच्या शतकाचा दुष्काळ मोडल्यानंतर विराटने पत्नी अनुष्का शर्माचे खराब फॉर्ममध्ये योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले. कारण अनुष्का ही एकच अशी व्यक्ती होती की, जी या कठीण काळात विराटच्या पाठीशी उभी राहिली आणि तिने विराटचा वाईट काळ जवळून पाहिला.

हेही वाचा – Virat Kohli Birthday : ऐश्वर्या, अनुष्का नव्हे तर विराट कोहलीला ‘ही’ अभिनेत्री आवडायची, पाहा कोण आहे

विराट कोहलीची आतापर्यंतची क्रिकेट कारकीर्द –

कोहलीने आतापर्यंत १०२ कसोटी, २६२ एकदिवसीय आणि ११३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्‍याच्‍या नावावर कसोटीमध्‍ये २७ शतके आणि २८ अर्धशतकांसह ८०७४ धावा आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये ४३ शतके आणि ६४ अर्धशतकांसह एकूण १२३४४ धावा केल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये त्याने एक शतक आणि ३६ अर्धशतकं लगावत एकूण ३९३२ धावा केल्या आहेत. तसेच विराट कोहलीने आयपीएलमध्ये २२३ सामन्यांत ५ शतके आणि ४४ अर्धशतके झळकावताना ६६२४ धावा केल्या आहेत.